I-League : अनिलच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सची सुदेवा दिल्ली एफसीवर मात

सुदेवा दिल्ली संघावर एका गोलने निसटती मात
Churchill Brothers FC Goa Team Player
Churchill Brothers FC Goa Team PlayerDainik Gomantak
Published on
Updated on

I-League : सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अनिल गावकर याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यामुळे त्यांना गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली.

वास्को येथील टिळक मैदानावर माजी विजेत्या संघाला सुदेवा दिल्ली एफसीवर 1-0 अशी निसटती मात केली. मैदानाच्या डाव्या बाजूने उल्लेखनीय खेळ केलेल्या अनिलने 84व्या मिनिटास गोलची नोंद केली.

Churchill Brothers FC Goa Team Player
Margao : सिंधुदुर्गात बलात्कार करून फरार संशयिताला गोव्यात अटक

सुदेवा दिल्लीच्या गोलक्षेत्रात धडक देत त्याने शानदार ड्रिंबलिंगद्वारे अगोदर बचावपटू सुजित साधू याला चकविले आणि नंतर गोलरक्षक प्रियांत यालाही गुंगारा दिला. अनिल सामन्याचा मानकरी ठरला.

चर्चिल ब्रदर्सचा हा 14 सामन्यांतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 20 गुण झाले आहेत. ऐजॉल एफसीचेही तेवढेच गुण आहेत, मात्र गोव्यातील संघाची गोलसरासरी +10 अशी सरस आहे. स्पर्धेत अजून एकही विजय नोंदविण्यास अपयशी ठरलेल्या सुदेवा दिल्लीला दहावा पराभव पत्करावा लागला. 12 सामन्यानंतर त्यांचे दोन गुण व बारावा क्रमांक कायम राहिला.

Churchill Brothers FC Goa Team Player
Gauri Achari Case : संशयित गौरव बिद्रेला मारहाण प्रकरणी दोघा कैद्यांवर गुन्हा दाखल

सामन्याच्या 18व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सला धक्का बसला. त्यांचा नवा परदेशी खेळाडू उरुग्वेचा मार्टिन चावेस याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, त्यामुळे यजमान संघाच्या आक्रमणांवर मर्यादा आल्या. 43व्या मिनिटास अनिल गावकरच्या क्रॉसपासवर चर्चिल ब्रदर्सच्या अब्दौलाये साने याला प्रेक्षणीय ठरू शकणाऱ्या गोलने हुलकावणी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jantar Mantar student protest
Delhi youth protest parliament march
Goa Football Player Dies
Pankaj Tripathi Brother attacked
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com