'Universal Boss' ला शेवटचा सामना खेळायचाय घरच्या मैदानावर!

तसेच ज्या ठिकाणाहून तो निवृत्त होणार आहे, अर्थात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे ते ही त्याने (Chris Gayle) सांगितले आहे.
Chris Gayle
Chris GayleTwitter/ ANI
Published on
Updated on

क्रिस गेल (Chris Gayle) रिटायर का सेमी रिटायर? मग हा प्रश्न का निर्माण झाला? अचानक गेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा का सुरु झाली. तर यामागे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केलेल्या काही गोष्टींचा संदर्भ आहे. टी20 विश्वचषक 2021 च्या (T20 World Cup 2021) शेवटच्या गट सामन्यात गेल ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मोठी खेळी खेळू शकला नाही, परंतु तो बाद झाल्यानंतर त्याला वाटले होते तो निवृत्त होणार आहे. आऊट झाल्यानंतर तो हेल्मेट काढून बॅट आकाशाच्या दिशेने उंच डोलवताना दिसला. त्यावेळी उपस्थितांनी त्याचे अभिवादनही स्वीकारले होते. सहकारी खेळाडूंना तो मिठी मारत होता. सामना संपल्यानंतर गेलनेच या अफवांवरुन पडदा हटवला. तसेच ज्या ठिकाणाहून तो निवृत्त होणार आहे, अर्थात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे तेही सांगितले.

Chris Gayle
न्यूझीलंडला अफगाणिस्तानने पराभूत करु दे रे देवा ! 'काळजी करु नका': रशिद खान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर गेल म्हणाला, ही सेमी रिटायरमेंट आहे. मला माझा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जमैकामध्ये (Jamaica) माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायचा आहे.” तसेच त्याने पुढील टी-20 विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, “मला आणखी एक विश्वचषक खेळायचा आहे, पण कदाचित वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड त्यासंबंधी परवानगी देणार नाही. सामन्यादरम्यान मी जे काही करत होतो ते फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी होते. माझ्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे. मी 42 वर्षांचा असूनही खूप मजबूत आहे." गेलच्या या ताज्या वक्तव्यावरुन तो आता तरी निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Chris Gayle
T20 World Cup 2021: रबाडाच्या हॅट्ट्रिकने आफ्रिका जिंकली, तरी ऑस्ट्रेलियाच क्लालिफाय

गेलसमोर सगळेच अपयशी!

गेल हा T20 क्रिकेटमधील महान फलंदाज आहे. त्याने 445 डावात 36.44 च्या सरासरीने आणि 145.4 च्या स्ट्राईक रेटने 14321 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 22 शतके आणि 87 अर्धशतके आहेत. नाबाद 175 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. टी-20 क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर 1100 हून अधिक षटकार आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये धावा करण्यात, शतके ठोकण्यात, अर्धशतक ठोकण्यात आणि षटकार मारण्यात तो आघाडीवर आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांबद्दल बोललो तर ख्रिस गेलने 79 सामने खेळले असून 1899 धावा केल्या आहेत. येथे त्याने दोन शतके आणि 14 अर्धशतके झळकावले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये गेलने 158 चौकार आणि 124 षटकार मारले आहेत.

गेल 22 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. 1999 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जरी त्याने खूप आधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अलीकडच्या काळात त्याचा सर्वाधिक भर टी-20 क्रिकेटवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com