Goa Bodybuilders : पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना एक लाख रुपये; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय पातळीवर असामान्य कामगिरीने गोवा आणि भारताचे नाव रोशन केले ; गौरेश, विजय, सुमीतचे अभिनंदन
Cm Pramod  Sawant
Cm Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Margao : मालदीवमध्ये हल्लीच झालेल्या दक्षिण आशियाई (सॅफ) बॉडीबिल्डिंग अँड स्पोर्टस फिजिक स्पर्धेत ब्राँझपदके जिंकलेल्या गोमंतकीय खेळाडूंचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शरीरसौष्ठवपटूंना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना गौरेश किनळेकर व विजय सुतार यांनी ब्राँझपदक पटकावले, तर सुमीत नाईक याला पदक थोडक्यात हुकले व त्याचा चौथा क्रमांक मिळाला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर असामान्य कामगिरीने गोवा आणि भारताचे नाव रोशन केले. त्याबद्दल हे खेळाडू कौतुकास पात्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंची पाठ थोपटताना सांगितले. शरीरसौष्ठवपटू व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Cm Pramod  Sawant
Goa Congress : राहुल यांच्या समर्थनार्थ ‘मौन सत्याग्रह'

गोमंतकीय शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासात गोमंतकीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वाटचालीत खेळाडूंना संघटनेचे मुख्य आधारस्तंभ मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे बहुमूल्य पाठबळ लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod sawant
Goa Politics
Cylinder Scheme Goa
Goa CM Pramod Sawant accident help
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com