WTC Final पूर्वी पुजाराचा जलवा, 12 सामन्यात 7 शतके ठोकून मोडला वसीम जाफरचा रेकॉर्ड!

Cheteshwar Pujara Record: इंग्लंडच्या ससेक्स संघाकडून खेळताना पुजाराने पुन्हा एकदा शानदार शतक झळकावले.
Cheteshwar Pujara
Cheteshwar PujaraDainik Gomantak
Published on
Updated on

Cheteshwar Pujara Record: एकीकडे टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त असताना दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी एक खेळाडू आपला जलवा दाखवत आहे.

आजकाल इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या चेतेश्वर पुजाराबद्दल आम्ही बोलत आहोत.

इंग्लंडच्या (England) ससेक्स संघाकडून खेळताना पुजाराने पुन्हा एकदा शानदार शतक झळकावले. त्‍याने त्‍याच्‍या 12व्‍या सामन्‍यात 7वे काऊंटी शतक झळकावून शानदार कामगिरी केली.

वसीम जाफरचा विक्रम मोडला

या शतकासह पुजाराचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदले गेले. त्याने फर्स्ट क्लास (FC) मध्ये 57 शतके झळकावणाऱ्या वसीम जाफरचा विक्रम मोडला. प्रथम श्रेणीतील सर्वाधिक शतके करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.

त्याने 58 एफसी शतके नोंदवली आहेत. या यादीत पुजाराच्या वरती सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) (81 शतके), सुनील गावस्कर (81 शतके), राहुल द्रविड (68 शतके) आणि विजय हजारे (60 शतके) आहेत.

पुजारा 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताकडून खेळणार आहे.

Cheteshwar Pujara
WTC Final साठी भारताचे 15 नाही, तर 19 खेळाडू जाणार लंडनला, 'या' चार बॉलरची नावे चर्चेत

अशी शानदार खेळी खेळली

ब्रिस्टल येथील काऊंटी ग्राउंडवर ग्लॉस्टरशायरविरुद्ध सलामीवीर अली ओर (36) आणि टॉम हेन्स (3) बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने शानदार फलंदाजी केली आणि टॉम अलस्पासोबत तिसऱ्या विकेटसाठी 100 धावा काढल्या. यानंतर पुजाराला जेम्स कोल्सची साथ मिळाली आणि दोघांनी पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली.

Cheteshwar Pujara
WTC Final: रहाणेसाठी उघडलं टीम इंडियाचं दार! कसा होता गेल्या वर्षाभरातील परफॉर्मन्स

तसेच, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 99 धावांवर खेळत होता आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवात होताच त्याने शतक पूर्ण केले.

यापूर्वी, त्याने ससेक्सकडून होव्ह येथे डरहमविरुद्ध त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात 115 धावा केल्या होत्या. सध्या सुरु असलेल्या 2023 काउंटी चॅम्पियनशिपमधील हे त्याचे दुसरे शतक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com