FC Goa vs Chennaiyin FC: एफसी गोवाला चेन्नईयीनचा धक्का; पराभवामुळे प्ले ऑफ पात्रतेवर संकट

चेन्नईयीनचा 2-1 गोलफरकाने विजय; चुकांमुळे एफसी गोवाची वाटचाल खडतर
ISL Fooball FC Goa vs Chennaiyin FC
ISL Fooball FC Goa vs Chennaiyin FC Dainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa vs Chennaiyin FC: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एकाच संघातर्फे सहा मोसमात १०४ सामने खेळलेल्या अनुभवी एदू बेदिया याची मोठी चूक एफसी गोवास गुरुवारी खूप महागात पडली.

त्यामुळे त्यांना चेन्नईयीन एफसीकडून २-१ फरकाने पराभूत व्हावे लागले आणि त्याचबरोबर स्पर्धेची प्ले-ऑफ पात्रताही संकटात सापडली, कदाचित कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली संघ पुढील फेरीत खेळूही शकणार नाही.

ISL Fooball FC Goa vs Chennaiyin FC
Prithvi Shaw नं केला देवाचा धावा, महिलेला मारहाणीच्या आरोपानंतर पोस्ट होतेय व्हायरल

बेदियाचा बॅकपास अंदाज चुकला. त्याला लाभ उठवत चेन्नईयीनचा कर्णधार अनिरुद्ध थापा याने चेंडूवर ताबा मिळवत वेगाने मुसंडी मारली. यावेळी एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याने आणखी मोठी चूक केली. त्याने गोलक्षेत्रात चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात अनिरुद्धला पाडले.

चेन्नईयीनला पेनल्टी फटका मिळाला आणि सामन्यातील दुसरा वैयक्तिक गोल करताना ७३ व्या मिनिटास क्वामे कारीकारी याने आपल्या संघाला २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवास सलग दुसरा पराभव पत्करावा लागला, तर अगोदरच आव्हान संपुष्टात आलेल्या थॉमस ब्रडॅरिच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सलग दुसरा विजय नोंदविला.

यजमान संघाचे पाठिराखे निराश

त्यापूर्वी, सामन्याच्या १०व्या मिनिटास व्हिन्सी बार्रेटोच्या पासवर घानाच्या क्वामे कारीकारी यानेच एफसी गोवाच्या बचावफळीतील विस्कळीतपणाचा लाभ उठवत चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली होती, तर नोआ सदावी याने प्रेक्षणीय गोलद्वारे ४९व्या मिनिटास एफसी गोवास बरोबरी साधून दिली होती.

त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक नववा गोल ठरला. एफसी गोवाने स्पर्धेत वारंवार चुका केला, पण त्यातून त्यांनी काहीच बोध न घेतल्याचे आजच्या महत्त्वपूर्ण लढतीत दिसून आले, मोक्याच्या क्षणी पुन्हा सदोष खेळ केल्यामुळे त्यांच्या पाठिराख्यांना खिन्नपणे स्टेडियम सोडावे लागले.

एफसी गोवास आज विजय अत्यावश्यक होता. चेन्नईयीचा बचाव मजबूत होता, त्यांचा गोलरक्षक समिक मित्राची कामगिरी अफलातून राहिली. एफसी गोवाचे पूर्वार्धातील प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.

ISL Fooball FC Goa vs Chennaiyin FC
National Gymnastics: राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत गोव्याची ब्राँझ पदकावर मोहोर

स्पर्धेतून बाहेर गेल्यातच जमा

एफसी गोवाला १९ लढतीत आठवा पराभव पत्करावा लागला व त्यामुळे त्यांचे २७ गुण व सहावा क्रमांक कायम राहिला. त्यांचा शेवटचा सामना सलग सात सामने जिंकलेल्या बंगळूर एफसीविरुद्ध होईल.

एफसी गोवा पराभूत झाल्यामुळे मुंबई सिटी (४६ गुण), हैदराबाद एफसी (३९) यांच्यानंतर केरळा ब्लास्टर्स (३१) व बंगळूर एफसी (३१) हे आणखी दोन संघ गुरुवारी सहा संघांच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरले. आता बाकी दोन जागांसाठी एटीके मोहन बागान (२८) व ओडिशा (२७) या संघांना संधी असेल, कारण त्यांचे प्रत्येकी दोन सामने बाकी असून एफसी गोवाचा फक्त एक सामना शिल्लक आहे.

दैवावर भरवसा ठेवून बाकी लढतीत अन्य संघांसाठी प्रतिकुल निकालाची प्रतीक्षाच त्यांच्या हाती आहे. चेन्नईयीनचा हा सहावा विजय ठरला. १९ लढतीतून २४ गुणांसह ते आठव्या क्रमांकावर कायम राहिले.

दृष्टिक्षेपात...

  • एफसी गोवाचे मोसमात ८ पराभव, त्यापैकी ४ फातोर्डा येथे

  • आयएसएलमधील २३ लढतीत चेन्नईयीनचे एफसी गोवाविरुद्ध ९ विजय

  • पहिल्या टप्प्यात एफसी गोवा २-० फरकाने पराभूत, त्याचा वचपा चेन्नईयीनने काढला

  • सलग ३ सामने गमावल्यानंतर चेन्नईयीन एफसी गोवाविरुद्ध विजयी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com