National Gymnastics | Goa Wins Bronze Medal
National Gymnastics | Goa Wins Bronze Medal Dainik Gomantak

National Gymnastics: राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत गोव्याची ब्राँझ पदकावर मोहोर

वैयक्तिक, तसेच सांघिक गटात जिंकली पदके
Published on

National Gymnastics: गोव्याने राष्ट्रीय ट्रॅम्पोलाईन व टम्बलिंग जिम्नॅस्टिक स्पर्धेत सांघिक, तसेच वैयक्तिक प्रकारात ब्राँझपदके जिंकली. भारतीय जिम्नॅस्टिक महासंघातर्फे घेण्यात आलेली स्पर्धा डोबिंवली (महाराष्ट्र) येथे झाली.

सबज्युनियर वयोगटात गोव्याच्या प्रत्युष उपाध्याय याला ट्रॅम्पोलाईन प्रकारात ब्राँझपदक मिळाले. सीनियर वयोगटात टॅम्पोलाईनमध्ये गोव्याचा अभिजित निंबाळकर ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. अभिजित हा गोव्याचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता आहे.

गतवर्षी बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत अभिजितने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

National Gymnastics | Goa Wins Bronze Medal
Goa Crime: जीव भांड्यात पडला! तब्बल 8 तासांच्या शोधमोहिमेनंतर जंगलात सापडला अपहरण झालेला चिमुरडा...

सीनियर सांघिक ट्रॅम्पोलाईनमध्ये गोव्याच्या संघाला 202.40 गुणांसह ब्राँझपदक मिळाले. महाराष्ट्राला सुवर्ण, तर सेनादलास रौप्यपदक प्राप्त झाले. गोव्याच्या सांघिक संघात अभिजित निंबाळकर, सुबोदीप नंदी, सुदीप्त सरदार, मैनाक दत्ता या जिम्नॅस्टचा समावेश होता.

सांघिक टम्बलिंग जिम्नॅस्टिकमध्येही गोव्याला ब्राँझपदक मिळाले. त्यांनी 85.20 गुण नोंदविला. या संघाचे सौहित सिन्हा, सुदीप भुईमाली, अनीश गायेन यांनी प्रतिनिधित्व केले.

गोव्यासाठी महत्त्वाची स्पर्धा

‘‘राष्ट्रीय स्पर्धेच्या पात्रतेसाठी आमच्यासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची होती. राज्यातील जिम्नॅस्टिकच्या साधनसुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्थेच्या विकासाबाबत आशावादी आहोत,’’ अशी प्रतिक्रिया गोवा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष सुदेश ठाकूर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com