Indian Premier League Champion: इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरु होणार आहे. यासाठी सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. खेळाडूही आपापल्या फ्रँचायझींची जर्सी रॉक करण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, आयपीएलच्या चॅम्पियनबाबतही अंदाज वर्तवले जात आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणता संघ IPL चॅम्पियन बनू शकतो, ज्याची काही कारणे आहेत.
आम्ही ज्या संघाबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून 5 वेळची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स आहे. मुंबईतही 17.50 कोटींचा एक खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षीय अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला या फ्रँचायझीने मोठ्या उदार मनाने इतक्या मोठ्या रकमेत विकत घेतले. कॅमेरुनही टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करु शकतो. कॅमेरुन ग्रीनने आतापर्यंत 20 कसोटी, 15 एकदिवसीय आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
त्याच्या एकूण T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, ग्रीनने 21 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 245 धावा केल्या आणि 5 बळी घेतले. ग्रीनच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 3185 धावा आणि 63 विकेट्स आहेत.
मुंबईची सर्वात मोठी ताकद म्हणजे रोहित शर्माचे (Rohit Sharma) कर्णधारपद. रोहितची नेतृत्व क्षमता सर्वांनाच ठाऊक आहे. रोहितने या संघाची कमान उत्कृष्ट पद्धतीने सांभाळली आहे.
अनेक खेळाडूंनी ऑन कॅमेरा सांगितले की, रोहितला पूर्ण स्वातंत्र्य देतो. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांना संधी मिळाल्यावर सामना फिरवण्याची क्षमता आहे आणि रोहितही त्यांना संधी देतो.
मुंबई इंडियन्स संघात 'मिस्टर-360 डिग्री' फलंदाज सूर्यकुमार यादवचाही (Suryakumar Yadav) समावेश आहे. सूर्यकुमारला सध्याच्या काळात टी-20 क्रिकेटचा बादशाह म्हटले जाते.
तो कोणत्याही गोलंदाजाला स्मॅश करु शकतो. 32 वर्षीय सूर्याने टी-20 फॉरमॅटमध्ये तीन शतके आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 5898 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 34.49 होती.
मुंबई इंडियन्सचा अंतिम संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड, मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय , जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमेरॉन ग्रीन, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, डी जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा आणि राघव गोयल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.