कॅच पकडण्याचा देखील झालाय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, व्हिडीओ होतोय व्हायरल

फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाने अमेरिकन फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोच्च झेल पकडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला.
620 Feet High Catch
620 Feet High CatchDainik Gomantak
Published on
Updated on

वर्षभरापूर्वी, माजी NFL खेळाडू आणि त्याच्या महाविद्यालयीन फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाने अमेरिकन फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोच्च झेल पकडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) प्रवेश केला. हा झेल 620 फूट उंच (620 Feet High Catch) होता. हा विक्रम करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून रग्बी बॉल टाकण्यात आला. आता वर्षभरानंतर या गिनीज रेकॉर्डचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Football)

620 Feet High Catch
ISL Football Tournament : साहिल ताव्होरा यापुढेही हैदराबादसोबतच

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टा अकाऊंटवरून नुकताच हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओमध्ये एक खेळाडू हेलिकॉप्टरमधून रग्बी बॉल अशा प्रकारे फेकतो की तो थेट मैदानात उभ्या असलेल्या त्याच्या सहकारी खेळाडूवर पडत असल्याचे दिसत आहे. मैदानात उभा असलेला खेळाडू या चेंडूकडे पाहतो आणि नंतर चेंडूच्या ओळीत येऊन तो पकडतो. यानंतर या कामगिरीचे साक्षीदार असलेले प्रेक्षक मैदानात उभ्या असलेल्या खेळाडूकडे धावताना दिसतात.

620 Feet High Catch
जर्मनीत केएल राहुलची शस्त्रक्रिया यशस्वी, गर्लफ्रेंड अथियाने घेतली विशेष काळजी

युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोना फुटबॉलच्या रॉब ग्रोन्कोव्स्की आणि जेड फिशने ही कामगिरी केली. हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 23 एप्रिल 2021 रोजी टस्कन येथील युनिव्हर्सिटी ऑफ ऍरिझोनाच्या फुटबॉल मैदानात करण्यात आला. रॉब ग्रोन्कोव्स्कीला युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोना वाइल्डकॅट्ससाठी एक शेवटचा झेल घ्यायचा होता आणि तो काहीतरी वेगळा असावा अशी त्याची इच्छा होती. यानंतर या झेलचे नियोजन करण्यात आले. या प्रयत्नात फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जेड फिश यांनी त्याला साथ दिली आणि 620 फूट उंचीवरून फेकलेला चेंडू त्याने जमिनिवर उभा राहून अचूकतेने झेलला. त्यावेळी प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे कौतूक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com