ISL Football Tournament : साहिल ताव्होरा यापुढेही हैदराबादसोबतच

गोमंतकीय मध्यरक्षकाचा आयएसएल विजेत्यांशी दोन वर्षांचा करार
ISL Football Tournament
ISL Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आयएसएल फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसीच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरलेला गोमंतकीय मध्यरक्षक साहिल ताव्होरा आणखी दोन मोसमात याच संघातर्फे खेळेल. करार वाढविल्यामुळे 26 वर्षीय खेळाडू 2023-24 पर्यंत या संघाचा सदस्य असेल.

साहिलच्या करारासंदर्भात हैदराबाद एफसीने मंगळवारी माहिती दिली. यावर्षी मार्चमध्ये झालेल्या आयएसएल अंतिम लढतीत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध हैदराबाद एफसीसाठी साहिलने 88व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला होता, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर हैदराबादने बाजी मारली होती. गतमोसमात तो आयएसएल स्पर्धेत 19 सामने खेळला, त्याने एक गोल आणि एक असिस्टची नोंद केली.

(ISL Football Tournament)

ISL Football Tournament
मडगाव रवींद्र भवनच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या : कलाकारांची मागणी

प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांत संपूर्ण संघाने, तसेच आपण स्वतः साधलेली प्रगती पाहून करार वाढविण्याचा निर्णय आपल्यासाठी सोपा ठरला, असे करारपत्रावर सही केल्यानंतर साहिलने सांगितले.

आमच्या संघासाठी साहिल निर्णायक खेळाडू आहे, सराव सत्रात प्रत्येक प्रशिक्षकासाठी हवाहवासा असलेला तो खेळाडू आहे. तांत्रिकदृष्ट्याही तो भक्कम आहे, असे मार्केझ यांनी साहिलविषयी नमूद केले.

आयएसएल स्पर्धेत साहिल ताव्होरा एकूण 45 सामने खेळला आहे, त्याने तीन गोल व एक असिस्टची नोंद केली आहे. 2019-20 पासून तो हैदराबाद एफसीतर्फे 31 सामने खेळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com