पणजी : तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या निकालाविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागणाऱ्या गोवा सरकारने दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी आपला निर्णय राखून ठेवला. (HC reserves its order in application filed by Goa govt against Tejpal’s acquittal)
न्यायमूर्ती एम एस सोनक आणि न्यायमूर्ती आर एन लड्ढा यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला. तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करणाऱ्या सत्र न्यायालयाच्या मे 2021 च्या निकालाविरुद्ध अपील करण्याची रजा मागणारा अर्ज राज्य सरकारने दाखल केला होता.
दरम्यान, तेजपाल याने आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेचे गोव्यातील एका हॉटेलमधील महोत्सवात लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार दाखल केला होता. म्हापसा जलदगती न्यायालयाने त्याला पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले होते. याचिका आव्हान देण्यास योग्य आहे ?
तेजपालने राज्य सरकारच्या आव्हान याचिकेविरोधात सादर केलेल्या अर्जात ती सुनावणीस घेण्यायोग्य आहे का? असा प्रश्न केला असून सुनावणी झाल्यास ती इन कॅमेरा घ्यावी, अशी विनंती केली होती. त्यातील इन कॅमेरासाठीची विनंती उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे, तर निर्दोषत्वाला आव्हान तसेच आव्हान देण्यास ती योग्य आहे का? असा प्रश्न केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.