Ronaldinho Video: रोनाल्डिन्हो पोहचला भारतात! दुर्गा पूजेसाठीही लावली हजेरी

Ronaldinho: ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलर रोनाल्डिन्हो भारतात आला आहे.
Ronaldinho
RonaldinhoANI

Brazilian footballer Ronaldinho arrives in Kolkata :

भारतात क्रिकेट वर्ल्डकप आणि नवरात्रीची धामधूम असतानाच रविवारी ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो कोलकातामध्ये पोहचला आहे. तो सध्या दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहे.

रोनाल्डिन्हो या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. तसेच त्याने कोलकातामध्ये आल्यानंतर तो दुर्गा पुजेसाठीही उपस्थित होता. तसेच त्याने फुटबॉल अकादमीचे उद्घाटन केले आहे. त्याचबरोबर त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली.

Ronaldinho
Lionel Messi Video: बापाची टीम हरली म्हणून निराशा झालेल्या मुलाचं मेस्सीकडून सांत्वन, पाहा Video

दरम्यान, रविवारी जेव्हा रोनाल्डिन्हो कोलकातामध्ये आला, तेव्हा त्याचे फुटबॉल चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक चाहते विमानतळावर त्याला पाहाण्यासाठी उपस्थित होते.

रोनाल्डिन्हो पहिल्यांदाच कोलकातामध्ये आला आहे. यापूर्वी कोलकातामध्ये पेले, दिआगो मॅरेडोना आणि लिओनेल मेस्सी असे अनेक दिग्गज फुटबॉलपटू येऊन गेले आहेत.

Ronaldinho
Cristiano Ronaldo: जखमी रोनाल्डोचा तो गोल अन् अल-नासरने जिंकला अरब क्लब चॅम्पियन्स कप

रोनाल्डिन्होने देखील ऑक्टोबरच्या सुरुवातीला कोलकातामध्ये येण्याची त्याची योजना असल्याचे फेसबुकवर पोस्ट करत सांगितले होते. या पोस्टमध्ये त्याने भारतातील सांस्कृतीक सण पाहण्याची, तसेच विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्याने स्पॉन्सर्सला आणि लहान मुलांनाही भेटणार असल्याचे म्हटले होते.

रोनाल्डिन्हो हा लोकप्रिय फुटबॉलपटूंपैकी एक आहे. 2005 मध्ये त्याने मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कारही जिंकला होता. त्याचबरोबर 2004 आणि 2005 मध्ये तो फिफाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने 2002 मध्ये ब्राझिककडून वर्ल्डकपही जिंकला आहे, तसेच २००६ मध्ये बार्सिलोनाकडून चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com