धोनी (Dhoni) या वर्षाच्या अखेरीस आयपीएलला निरोप देईल, असे ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी म्हणले आहे.
धोनी (Dhoni) या वर्षाच्या अखेरीस आयपीएलला निरोप देईल, असे ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी म्हणले आहे. Dainik Gomantak

एमएस धोनीच्या IPL मधून निवृत्तीबाबत ब्रॅड हॉग यांचा मोठा खुलासा

धोनी (Dhoni) वयाबरोबर आपली धार गमावत आहे. KKR विरुद्ध वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakraborty) चेंडूवर त्याचा बाद होणे हे त्याचे मोठे उदाहरण आहे. मला वाटते की धोनी या वर्षाच्या अखेरीस आयपीएलला निरोप देईल.
Published on

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण सध्या तो IPL मध्ये चेन्नई सुपर किंन्स (CSK) संघाचे कर्णधार पद संभाळत आहे. परंतु आता त्याच्या आयपीएल मधून निवृत्तीच्या (Retirement from IPL) बातम्याही येऊ लागल्या आहेत. IPL 2021 धोनीचा बीसीसीआय (BCCI) लीगमधील शेवटचा हंगाम आहे का? धोनी या हंगामानंतर पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही का? असे प्रश्न निर्माण समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी या प्रश्नांबाबत मोठा खुलासा केला आहे.

धोनी (Dhoni) या वर्षाच्या अखेरीस आयपीएलला निरोप देईल, असे ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी म्हणले आहे.
IPL 2021 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात या दमदार फलंदाजाला स्थान

ब्रॅड हॉगने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, धोनी वयाबरोबर आपली धार गमावत आहे. KKR विरुद्ध वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्याचा बाद होणे हे त्याचे मोठे उदाहरण आहे. मला वाटते की धोनी या वर्षाच्या अखेरीस आयपीएलला निरोप देईल. ज्या प्रकारे तो चक्रवर्तीच्या चेंडूवर बाद झाला, त्यातून त्याची धार आता बोथट झाल्याचे स्पष्ट होते. त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये मोठे अंतर राहत आहे. त्याच्या आऊट होण्याच्या पध्दतीमध्ये त्याच्या वयाचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. असे ब्रॅड हॉग यांनी नमूद केले.

धोनी (Dhoni) या वर्षाच्या अखेरीस आयपीएलला निरोप देईल, असे ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी म्हणले आहे.
कॅप्टन कूल धोनी चिडला; पहा video

धोनीची धार बोथट झालीये

भारतीय क्रिकेट आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी हे चांगले आहे की, नेतृत्वावर त्याचा भर अजूनही मैदानाच्या मध्यभागी दिसून येतो, तो अजूनही गोष्टी त्याच्या शांत स्वभावाप्रमाणे हाताळत आहे. एक क्रिकेटर म्हणून तो जडेजाला संधी देत आहे. पण, ज्या प्रकारे त्याची फलंदाजी चालू आहे, तो बाद झाला की असे दिसते त्याची धार आता बोथट होऊ लागली आहे. केकेआरविरुद्ध तो फक्त 1 धाव करुन बाद झाला. तरी CSK हा सामना जिंकला आहे.

व्यवस्थापनाच्या भूमिकेत धोनी ठरू शकतो हिट

हॉगने टी -20 विश्वचषकासाठी धोनीला मार्गदर्शक बनवल्याबद्दलही टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, धोनी लवकरच व्यवस्थापनाच्या भूमिकेत दिसू शकेल. याशिवाय, येत्या काळात तो CSK चे मुख्य प्रशिक्षकही बनू शकतो. धोनी व्यवस्थापनाच्या भूमिकेत येत आहे किंवा तो स्टीफन फ्लेमिंगसह CSK मध्ये तरुणांना अधिक संधी देऊ शकतो. याशिवाय तो संघासाठी अधिक चांगली रणनीती देखील तयार करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com