IPL 2021 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात या दमदार फलंदाजाला स्थान

IPL 2021 Robin Uthappa has been included in Dhoni Chennai Super Kings squad
IPL 2021 Robin Uthappa has been included in Dhoni Chennai Super Kings squad
Published on
Updated on

नवी दिल्ली: आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वीच राजस्थान रॉयल संघानं राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी आणि दमदार फलंदाज रॉबिन उथप्पाचा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश केला आहे. गुरुवारी रात्री ट्विट करून ही माहिती त्यांनी दिली आहे. यंदाच्या स्पर्धेत उथप्पा राजस्थानऐवजी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. फलंदाज रॉबिन उथप्पा चेन्नईकडून खेळणार असल्याची घोषणा राजस्थान संघाने केली आहे.

लिलावापूर्वीच स्टीव स्मिथनंतर उथप्पालाही सोडल्यामुळे राजस्थान संघाकडे पैसे वाढले आहेत. मागील आयपीएल हंगाम राजस्थानकडून स्टीव स्मिथच्या नेतृत्वात खेळताना उथप्पाचा आयपीएल हंगाम खराब गेला होता. आयपीएलमधील गेल्या दोन हंगामात उथप्पाच्या नशिबी मात्र अपयश आले आहे. 2019 मध्ये त्याने 115.1 एसआर येथे केवळ 282 धावा केल्या आणि नाईट रायडर्सने त्याला सोडले होते.

IPL 2021 Robin Uthappa has been included in Dhoni Chennai Super Kings squad
इंडियन सुपर लीग: ‘अपराजित’ संघात जोरदार चुरस

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला उथप्पा आता नव्या हंगामात चेन्नई सोबत खेळतांना दिसणार आहे. उथप्पा ने चेन्नई संघात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आणि राजस्थानबरोबर घालवलेले क्षण आठवत म्हणाला, "राजस्थान रॉयल्सबरोबर माझे वर्ष खरोखर आनंदात गेले आणि या फ्रँचायझी संघात सहभागी होण्याची मला एक चांगली संधी मला मिळाली. आता २०२१ मध्ये चेन्नईबरोबर माझा क्रिकेट प्रवास सुरू होत आहे त्याबाबत मला उत्सुकता आहे आणि मी खूप उत्साही आहे."

2020 च्या लिलावादरम्यान उथप्पाला राजस्थान संघाने विकत घेतले आणि त्याचा संघात समावेश केला होता. या हंगामात तो 12 सामने खेळल्यानंतर केवळ 196 धावा करू शकला होता. हा आयपीएल चा तिसरा हंगाम होता ज्यात त्याने एकही अर्धशतक केले नव्हते. मागीलवर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघ 14 सामन्यांत 12 गुणांसह खालच्या स्थानावर होता.

राजस्थान रॉयल्सच्या वतीने जेक लूश म्हणाले की, "रोबीनने संघात राहताना केलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो, गुवाहाटी आणि नागपूर येथे आमच्या सोबत त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आणि विश्वचषक विजेत्यांच्या सत्रादरम्यान त्यांनी दिलेलं भाषण मी आजपर्यंत ऐकलेलं सर्वात शक्तिशाली भाषण होतं."

आयपीएलमध्ये 2008 पासून दमदार फलंदाजी करणाऱ्या रॉबिनच्या नावावर 4607 धावावांचा रेकॉर्ड आहे. त्याने 2014 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवला आहे. आयपीएलमध्ये केकेआरसाठी त्याने 660 धावा केल्या होत्या. 2014 च्या आयपीएलमध्ये कोलकाता संघाच्या विजयात रॉबिनचा सिंहाचा वाटा होता.रॉबिन उथप्पा राजस्थान संघाच्या आधी कोलकाता, मुंबई, आरसीबी आणि पुणे संघाकडूनही खेळला आहे.

राजस्थानरॉयल कडून खेळताना उथप्पाचा मागील आयपीएल हंगाम खराब गेला होता. राजस्थान संघानं रॉबिनचे आभार मानले असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com