क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड चॅम्पियनची हत्या, घराबाहेरच दोन हल्लेखोरांनी केला बेछूट गोळीबार VIDEO

South Africa boxer Zolani Tete murder: बॉक्सिंग विश्वातून धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी विश्वविजेते बॉक्सर जोलानी ‘लास्ट बॉर्न’ टेटे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
South Africa boxer Zolani Tete murder
South Africa boxer Zolani Tete murderDainik Gomantak
Published on
Updated on

बॉक्सिंग विश्वातून धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी विश्वविजेता बॉक्सर जोलानी ‘लास्ट बॉर्न’ टेटे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अवघ्या ३८ वर्षांच्या टेटेच्या मृत्यूने क्रीडा जगतात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रिंगमध्ये आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या टेटेने एका सामन्यात अवघ्या ११ सेकंदांत विजय मिळवत विश्वविक्रम नोंदवला होता. मात्र, आता त्याच्या आयुष्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दोन हल्लेखोरांनी केला गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी दक्षिण आफ्रिकेतील ईस्टर्न केप प्रांतातील मडॅंटसाने येथे ही घटना घडली. टेटे आपल्या घराबाहेर वाहनात बसून गेट उघडण्याची वाट पाहत होते. त्याचवेळी एका वाहनातून दोन अज्ञात आणि चेहरा झाकलेल्या व्यक्ती खाली उतरल्या. त्यांनी टेटेच्या दिशेने अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात टेटेला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

South Africa boxer Zolani Tete murder
Gyanesh Kumar Goa Visit: मुख्य निवडणूक आयुक्त गोवा दौऱ्यावर येणार! 2 आणि 3 सप्टेंबरला दोन दिवसांचा दौरा

कारमधील महिलेलाही गोळ्या लागल्या

या हल्ल्याच्या वेळी टेटेसोबत कारमध्ये २७ वर्षीय एक महिला देखील होती. गोळीबारात तीही जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. टेटेला लक्ष्य करण्यामागे वैयक्तिक कारण होते की अन्य काही पार्श्वभूमी होती, याबाबत तपासानंतरच माहिती स्पष्ट होणार आहे.

वयाच्या आठव्या वर्षी सुरू केला बॉक्सिंगचा प्रवास

जोलानी टेटे अगदी लहान वयात बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवले होते. अवघ्या आठव्या वर्षापासून त्यांनी या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मेहनत, सातत्य आणि रिंगमधील आक्रमक शैलीच्या जोरावर त्याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे त्याने दोन वेगवेगळ्या वजनगटांमध्ये विश्वविजेतेपद पटकावून आपल्या कारकिर्दीतील मोठी कामगिरी नोंदवली.

South Africa boxer Zolani Tete murder
Goa BJP: प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्लीत सादर केला अहवाल; भाजपचे निवडणूक धोरण रविवारी

दोन वजनगटांत मिळवलं विश्वविजेतेपद

२०१४ मध्ये टेटेने IBF ज्युनियर-बँटमवेट वर्ल्ड टायटल जिंकले. त्यानंतर त्याने वजनगट बदलून बँटमवेटमध्ये प्रवेश केला. या गटातही त्याची विजयी घोडदौड कायम राहिली आणि त्यांनी WBO वर्ल्ड टायटल आपल्या नावावर केले. २०१७ मध्ये त्याने आपल्या या किताबाचे यशस्वीपणे संरक्षणही केले होते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या वजनगटांमध्ये विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या बॉक्सरमध्ये त्यांची गणना झाली.

अवघ्या ११ सेकंदांत मिळवला होता ऐतिहासिक विजय

टेटे यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चेत राहिलेला क्षण म्हणजे त्यांचा विक्रमी नॉकआउट. एका सामन्यात त्यांनी सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यावर जबरदस्त दबाव निर्माण केला. लढतीच्या अवघ्या पाचव्या सेकंदात त्यांनी पहिला प्रभावी पंच मारला. त्यानंतर केलेल्या आणखी एका हल्ल्यात प्रतिस्पर्धी खाली कोसळला. काही क्षणांतच सामना संपला आणि ११व्या सेकंदाला टेटे यांना विजेता घोषित करण्यात आले.

या वेगवान विजयामुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले. बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात वेगवान नॉकआउट विजयांपैकी हा एक मानला जातो. रिंगमध्ये एवढ्या वेगाने सामना संपवणारा बॉक्सर म्हणून टेटे यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

एकीकडे रिंगमध्ये विक्रम प्रस्थापित करणारा आणि दोन वजनगटांत विश्वविजेता ठरलेला खेळाडू, तर दुसरीकडे वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी गोळीबारात झालेला मृत्यू, या विरोधाभासामुळे टेटे यांच्या निधनाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू असून या घटनेमागील कारण आणि हल्लेखोरांची ओळख समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com