WPL 2024: शाहरुख-शाहिदसह 'या' सहा स्टार्सच्या परफॉर्मन्सने रंगणार उद्घाटन सोहळा; कधी अन् कुठे पाहाणार? घ्या जाणून

WPL 2024 Opening Ceremony: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात होत असून त्याआधी मोठा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला शाहरुख अन् शाहिदसह अनेक स्टार हजेरी लावणार आहेत.
WPL 2024 Opening Ceremony | Shah Rukh Khan | Shahid Kapoor
WPL 2024 Opening Ceremony | Shah Rukh Khan | Shahid KapoorDainik Gomantak

Bollywood superstars to perform at WPL 2024 opening ceremony in Bengaluru:

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला (WPL 2024) शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. डब्ल्यूपीएलचा यंदा दुसरा हंगाम असणार आहे. गेल्यावर्षी पहिल्या हंगामाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंती मिळाली होती.

पहिल्या हंगामाप्रमाणेच यावर्षीदेखील पाच संघात ही स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान स्पर्धेसाठी बीसीसीआय आणि फ्रँचायझींची जोरदार तयारी झाली असून उद्घाटन सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

डब्ल्यूपीएल 2024 स्पर्धेचा पहिला सामना बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा होणार आहे. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार हजेरी लावणार आहेत. याची माहिती डब्ल्यूपीएलकडून देण्यात आली आहे.

WPL 2024 Opening Ceremony | Shah Rukh Khan | Shahid Kapoor
WPL 2023 Final: मुंबईच्या पोरींनी मारलं फायनलचं मैदान! विजयी चौकार ठोकताच टीमचा जल्लोष, Video एकदा पाहाच

उद्धाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण सुपरस्टार शाहरुख खान आहे. शाहरुख आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संघमालकही आहे.

दरम्यान, केवळ शाहरुखच नाही, तर शाहीद कपूर, टायगर श्रॉफ, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूड अभिनेतेही या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार असून या सहाही जणांचे परफॉर्मन्स चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

कुठे आणि कसा पाहायचा उद्घाटन सोहळा?

दरम्यान, पहिल्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी शुक्रवारीच एम चिन्नास्वामी स्टेडियमवरच हा उद्घाटन सोहळा होणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल.

हा उद्धाटन सोहळा स्टेडियममध्ये प्रेक्षकांना तर पाहाता येणारच आहे, पण त्याचबरोबर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर आणि जिओ सिनेमा ऍव व वेबसाईटवरही या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

WPL 2024 Opening Ceremony | Shah Rukh Khan | Shahid Kapoor
WPL 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

असा रंगणार यंदाचा डब्लूपीएल हंगाम

दुसऱ्या हंगामातही 22 सामने होणार असून पहिला टप्पा बंगळुरूमध्ये, तर दुसरा टप्पा दिल्लीमध्ये रंगणार आहे.

साखळी फेरीनंतर गुणतालिकेतील पाच संघांपैकी पहिले तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. पहिल्या क्रमांकावर राहिलेला संघ थेट अंतिम सामना खेळले, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात एलिमिनेटर सामना होईल.

एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम सामना खेळेल. एलिमिनेटर सामना 15 मार्च रोजी होईल, तर अंतिम सामना 17 मार्चला होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com