मोठा निर्णय! ट्रेंट बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार

‘मला कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे त्यामुळे मला करारातून मुक्त करावे’, अशी मागणी बोल्टने याआधी केली होती.
Trent Bolut
Trent BolutDainik Gomantak
Published on
Updated on

काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा आक्रमक खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती आणि त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. तसेच आता पुन्हा जागतिक क्रिकेटमधील एक प्रमुख खेळाडू निवृत्तीच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज आणि आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ट्रेंट बोल्टने (Trent Bolut) क्रिकेट मंडळासोबत आपला करार संपवला आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. (Big decision Trent Boult ends contract with New Zealand Cricket Board)

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने 33 वर्षीय ट्रेंट बोल्टला केंद्रीय करारातून मुक्त केले आहे आणि विशेष म्हणजे करारातून मुक्त करण्यासाठी स्वत: बोल्टने मंडळाकडे अपील केले होते. त्यानंतर मंडळाने हा निर्णय घेतला आहे ‘मला कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे त्यामुळे मला करारातून मुक्त करावे’, अशी मागणी बोल्टने याआधी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com