न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, महिला-पुरुष खेळाडूंना मिळणार समान वेतन

भारतात मात्र अद्यापही महिला आणि पुरूष क्रिकेट खेळाडूंना समान वेतन दिले जात नाही.
New Zealand Cricket Players Association
New Zealand Cricket Players AssociationTwitter/@WHITE_FERNS
Published on
Updated on

New Zealand Cricket: न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket) प्लेयर्स असोसिएशनने (New Zealand Cricket Players Association) मोठा निर्णय घेतला आहे. तो मोठआ निर्णय असा की, न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना समान वेतन देण्यात येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू संघटना आणि 6 प्रमुख संघटनांमध्ये या ऐतिहासिक निर्णयावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सहमती दर्शवली आहे.

New Zealand Cricket Players Association
मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआय अन् एमसीएला फटकारलं

महिला आणि पुरुष खेळाडूंना समान वेतन मिळणार

न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले की, आमच्या खेळाच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. क्रिकेट अधिक चांगले व्हावे त्याचा विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांना सांगितले. खरे तर, महिला क्रिकेटमध्ये बदल व्हावेत आणि येणाऱ्या काळात महिला क्रिकेटला चांगला प्रतिसाद मिळावा अशी आमची इच्छा आहे. यासंदर्भात आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंना समान वेतन मिळणार, हा खूप चांगला निर्णय आहे, असे न्यूझीलंडची महिला खेळाडू सोफी डेव्हाईन म्हणाली.

न्यूझीलंड क्रिकेटचा ऐतिहासिक निर्णय

न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन आणि न्यूझीलंड क्रिकेटचा हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आतापर्यंत महिला आणि पुरुष खेळाडूंना समान वेतन मिळत नव्हते. महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन मिळावेत, ही मागणी बऱ्याच दिवसांपासून लागून धरण्यात आली होती, पण आता न्यूझीलंड क्रिकेटने हा निर्णय घेवून या मागणीवर शिक्कामोर्तब केला आहे.

New Zealand Cricket Players Association
ENG vs IND: एजबॅस्टनमध्ये भारतीय चाहत्यांवर वर्णद्वेशावरून टिप्पणी, पाहा व्हिडिओ

या ठिकाणी भारतीय क्रिकेट विश्वाचा विचार केला तर, भारतात मात्र अद्यापही महिला आणि पुरूष क्रिकेट खेळाडूंना समान वेतन दिले जात नाही. आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचा परिणाम भारतीय क्रिकेट बोर्डावर (BCCI) होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com