ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. आतापर्यंत चार दिवसांचा खेळ झाला असून आता पाचव्या दिवसाचा खेळ बाकी आहे. दरम्यान, पुन्हा एकदा अशी घटना समोर आली आहे, जी घडायला नको होती. सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षकांवर वर्णद्वेषी टिप्पणी केली ज्यामुळे स्टेडियममधले वातावरण बिघडले. भारतीय चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून या सर्व घटना चौथ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या सत्रात घडल्याचा दावा केला आहे. मात्र, दरम्यान, ईसीबी अर्थात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण गंभीर असून त्याची चौकशी केली जाईल, असे निवेदन जारी करण्यात आले आहे.
टीम इंडिया बॅकफूटवर होती
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची कसोटी सुरू आहे. टीम इंडियाने अखेरच्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण इंग्लंडने चांगली फलंदाजी करत सामना रंजक वळणावर नेला. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या सत्रात जेव्हा इंग्लंडचा संघ खूप मजबूत दिसत होता आणि टीम इंडिया बॅकफूटवर होती, या दरम्यानच ही घटना समोर आली आहे.
क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला स्थान नाही
दरम्यान, ईसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'वर्णद्वेषी घटनेबद्दल ऐकून त्यांना धक्का बसला आहे आणि काळजी वाटली आहे. आम्ही एजबॅस्टन येथील सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आहोत. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला स्थान नाही, असा प्रकार घडला असेल तर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले जाईल.'
एजबॅस्टनमध्ये कुणालाही शिवीगाळ करू नये
वॉरविकशायरचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट केन यांनी सांगितले की, 'या प्रकरणामुळे आम्हालाही धक्का बसला आहे, कारण आम्ही एजबॅस्टनला सर्वांसाठी सुरक्षित, स्वागतार्ह वातावरण बनवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत. सुरुवातीचे ट्विट पाहिल्यानंतर, ज्याने हे प्रकरण समोर आणले आहे त्याच्यासोबत आण्ही चर्चा करतआहोत. सध्या एजबॅस्टनमध्ये कुणालाही शिवीगाळ करू नये. त्यामुळे एकदा आम्हाला सर्व तथ्ये मिळाल्यावर आम्ही पुढे काय करायचे ते ठरवू.'
अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज
सामन्याचा विचार करता इंग्लंडने चौथ्या दिवशी यष्टीमागे 3 बाद 259 धावा केल्या आहेत. एजबॅस्टन येथे मंगळवारी शेवटच्या दिवशी 378 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडला आता फक्त 119 धावांची गरज आहे आणि अजून सात विकेट्स शिल्लक आहेत. माजी कर्णधार जो रूट नाबाद 76 आणि बेअरस्टो 72 धावांवर खेळत होते. दुसरीकडे, टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या सात विकेट्स घ्याव्या लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.