बार्देश इलेव्हन महिला टी-२० स्पर्धेत विजेते

अंतिम लढतीत मडगाव संघावर मात, शिखा पांडेच्या ८६ धावा
Bhardes XI
Bhardes XI dainik gomantak
Published on
Updated on

पणजी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिखा पांडे हिच्या तडाखेबंद ८६ धावांच्या बळावर बार्देश इलेव्हन संघाने महिलांच्या टी-२० स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्यांनी मडगाव संघाला अंतिम लढतीत आठ धावांनी हरविले. (Bhardes XI beat Madgaon team In the final T-20 match of the GCA competition)

Bhardes XI
गोव्याने वर्चस्व गमावले, उत्तर प्रदेशची 81 धावांची आघाडी

व्हिजुअल लिंक क्रिकेटर्सने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (Goa Cricket Association) सहकार्याने घेतलेल्या स्पर्धेतील अंतिम सामना कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या बांदोडकर मैदानावर (Panaji Gymkhan's Bandodkar Maid) झाला.

बार्देश इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५१ धावा केल्या. शिखाच्या ८६ धावांव्यतिरिक्त ऊर्वशी गोवेकरने १६, तर तनया नाईकने १५ धावा केल्या. मडगावच्या तेजस्विनी दुर्गडने दोन व संजुला नाईकने एक गडी बाद केला. मडगाव संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले, पण विजयाचे प्रयत्न थोडक्यात हुकले. संजुला नाईकच्या ६४ धावा, तसेच इब्तिसाम शेखच्या २८ व विनवी गुरवच्या १५ धावांच्या बळावर मडगावला ३ बाद १४३ धावा करता आल्या. बार्देशच्या तनया नाईक, आर्या आजगावकर सिद्धा सवासे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली.

वैयक्तिक बक्षिसे

- अंतिम सामन्याची मानकरी : शिखा पांडे

- स्पर्धेत फलंदाजीत उत्कृष्ट : संजुला नाईक

- स्पर्धेत गोलंदाजीत उत्कृष्ट : प्रतीक्षा गडेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com