टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी संघाची घोषणा केली आहे. अखेर 15 खेळांडूच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. टी -20 क्रिकेट विशेषत: हा फलंदाजाचा खेळ म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच्या 15 सदस्यीय संघात पाकिस्तानने केवळ पाचत फलंदाजांना संघात स्थान दिले आहे. 5 फलंदाजांव्यतिरिक्त त्यांनी 2 यष्टीरक्षक, 4 अष्टपैलू आणि 4 वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. 3 खेळाडू राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे. पाकिस्तान संघाला टी -20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंडच्या (England) आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ 24 ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. परंतु, त्याआधी ते लाहोर आणि रावळपिंडीच्या घरच्या मैदानावर 7 टी -20 सामने खेळणार आहेत. हे सर्व सामने 25 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत.
या दोन खेळाडूंना कामगिरीचे बक्षीस मिळाले
आसिफ अली (Asif Ali) आणि खुशदिल शाह (Khushdil Shah) पाकिस्तानच्या संघात परतले आहेत. या दोन खेळाडूंच्या सहभागामुळे संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. या खेळाडूंनी घरच्या मैदानावर केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या आधारे टी -20 विश्वचषकासाठी निवड झाली आहे. आसिफने पाकिस्तानसाठी शेवटचा टी -20 सामना या वर्षी एप्रिलमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर खुशदील शाह या वर्षाच्या सुरुवातीला लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. टी -20 मध्ये आसिफ अलीचा स्ट्राईक रेट 147 आहे, तर डावखुरा फलंदाज खुशदिल शाहचा स्ट्राइक रेट 134 आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक मुहम्मद वसीम म्हणाले, संघ निवडताना आम्ही प्रत्येक क्षेत्राचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. संघात क्षमता, उत्कटता, अनुभव यांचे उत्तम मिश्रण आहे. "
टी -20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, असील अली, आझम खान, हॅरिस रौफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदील शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन शाह आफ्रिदी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.