Women IPL In 2023: बीसीसीआय ची महिला आयपीएलबाबत मोठी घोषणा

बीसीसीआयने महिला आयपीएलबाबतची अनेक दिवसांपासून सुरु असेलेली मागणी अखेर मान्य केली. पुढील वर्षापासून 6 संघांची स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Women's IPL
Women's IPLDainik Gomantak
Published on
Updated on

बीसीसीआयने महिला आयपीएलबाबतची अनेक दिवसांपासून सुरु असेलेली मागणी अखेर मान्य केली. पुढील वर्षापासून 6 संघांची स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर शुक्रवार, 25 मार्च रोजी मुंबईत झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत, बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी महिला आयपीएल सुरु करण्याबाबत चर्चा केली. ज्यात असा निष्कर्ष काढण्यात आला की, देशात महिला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याची प्रचंड क्षमता आहे. अशा प्रकारे बीसीसीआयने 6 संघांसह स्पर्धा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 2023 मध्ये महिला आयपीएलची सुरुवात करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असेही सांगण्यात आले आहे. (BCCI's big announcement about women's IPL, starting with 6 teams next year)

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बोर्डाने 6 संघांच्या निवडीचा पहिला प्रस्ताव फक्त विद्यमान आयपीएल फ्रँचायझींनाच दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने नवीन हंगामापासून आयपीएलमधील संघांची संख्या 8 वरुन 10 केली आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझींसमोर महिला संघ तयार करण्याचा प्रस्ताव बोर्ड ठेवणार आहे. जर ते पूर्णपणे यशस्वी झाले नाही, तर बोर्ड फ्रँचायझींसाठी नवीन अर्जांची मागणी करेल.

Women's IPL
CSK vs KKR, IPL 2022: केकेआरची यंग ब्रिगेड, सीएसकेच्या 'अनुभवा'वर पडणार का भारी

महिलांचे T20 चॅलेंज मे मध्ये होणार

यासोबतच महिला टी-20 चॅलेंज टूर्नामेंट या वर्षी पुन्हा सुरु केली जाईल, असा निर्णय बोर्डाने घेतला आहे. ही तीन संघांची स्पर्धा 2019 मध्ये सुरु झाली असून जी आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांदरम्यान खेळली गेली होती. गतवर्षी 4 सामन्यांची ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. आता या मोसमाचे आयोजन मे महिन्यात प्लेऑफ सामन्यांच्या आसपास केले जाईल. दुसरीकडे या स्पर्धेबाबत प्रायोजकांनी दाखवलेल्या समर्थनामुळे महिला आयपीएलची वेगळी आणि मोठी स्पर्धा सुरु होण्यासही चालना मिळेल, असेही मंडळाने म्हटले आहे.

Women's IPL
'संजना लवकर परत ये,' बुमराह ने लिहिली पत्नीसाठी सोशल मीडिया पोस्ट

WBBL, T20 ब्लास्ट आणि PCB च्या योजनांमुळे BCCI वर दबाव

15 वर्षांपूर्वी जगातील पहिली आणि सर्वात यशस्वी टी-20 लीग सुरु करणाऱ्या बीसीसीआयने महिलांच्या स्पर्धेबाबत फार पूर्वीपासून उदासीनता बाळगली आहे. आयपीएलनंतर सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग आणि इंग्लंडच्या टी-20 ब्लास्ट आणि द हंड्रेडसारख्या लीगमध्ये गेल्या काही वर्षांपासून महिलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याचवेळी, मागील काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महिला पीएसएल सुरु करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे बोर्डावर सतत दबाव आणणाऱ्या बीसीसीआयसमोर महिलांच्या आयपीएलची मागणीही तीव्र झाली होती. त्याच वेळी, या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगसह 3 संघांच्या महिला सीपीएलच्या परिचयाने बीसीसीआयला कठीण स्थितीत आणले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com