IPL मुळे भरणार BCCI चा खिसा! 14 वर्षानंतर बदलणार इतिहास

गेल्या 14 वर्षांप्रमाणे, पुन्हा एकदा भारतीय मंडळ सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी T20 लीग म्हणजेच IPL 2022 च्या माध्यमातून मोठी कमाई करणार आहे.
BCCI latest news | BCCI news | cricket news updates
BCCI latest news | BCCI news | cricket news updatesDainik Gomantak
Published on
Updated on

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे मोठी रक्कम जमा होणार आहे. गेल्या 14 वर्षांप्रमाणे, पुन्हा एकदा भारतीय मंडळ सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी T20 लीग म्हणजेच IPL 2022 च्या माध्यमातून मोठी कमाई करणार आहे. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या 15 व्या मोसमातून बोर्डाला किती कमाई होणार, हे स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरच कळेल, मात्र सध्यातरी प्राथमिक माहिती अशी आहे की, बीसीसीआयला केवळ प्रायोजकत्व स्पॉन्सरशिप 800 कोटी रुपये मिळणार आहेत. प्रचंड कमाई असेल, जी स्पर्धेच्या इतिहासातील एका हंगामातील सर्वोच्च रक्कम आहे. (BCCI will get huge amount from IPL which will change history after 14 years)

BCCI latest news | BCCI news | cricket news updates
IND Vs SL: 'या' खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन

बीसीसीआयने यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर बदलला, तर काही नवीन प्रायोजकही लीगशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळे बीसीसीआयचे बँक खाते पूर्वीपेक्षा अधिकच भरले जाणार आहे. एका अहवालानुसार, टाटाचे टायटल स्पॉन्सर बनण्याव्यतिरिक्त, यावेळी लीगसाठी 9 मोठे ब्रँड प्रायोजकत्वाखाली जोडले गेले आहेत, जे बीसीसीआयला या हंगामात 800 कोटी रुपये देले जाणार आहेत. (BCCI news updates)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे कमाई,

स्पोर्ट्स वेबसाइटच्या अहवालानुसार, इनसाइड स्पोर्ट, भारत सरकारची ऑनलाइन पेमेंट सेवा प्रणाली RuPay आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप Swiggy Instamart यांनी बोर्डासोबत एक कठोर करार केला. याअंतर्गत रुपेचे 420 कोटी आणि स्विगीचे 44 कोटी बीसीसीआयच्या झोळीत पडणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या वक्तव्याचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, “हे ब्रँड म्हणून आयपीएलचे मूल्य आहे. या नवीन स्पॉन्सरशिपच्या आगमनाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. मी आकडेवारीवर टिप्पणी करणार नाही, पण आयपीएल 2022 मध्ये आम्ही आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारे आहोत.

BCCI latest news | BCCI news | cricket news updates
मडकई संघाची विजयी घौडदौड, आर्लेम संघाचा उडवला धुव्वा

Tata, Rupay आणि Swiggy व्यतिरिक्त, नवीन हंगामातील इतर प्रमुख प्रायोजक त्याच कंपन्या आहेत ज्या गेल्या काही वर्षांपासून बोर्डवरती आहेत, ज्यात Dream XI, Paytm, CEAT, Unacademy सारख्या मोठ्या कंपन्यांचा देखील समावेश आहे.

10 संघ, 74 सामने

यावेळी 10 संघांसह आयपीएल खेळवली जाणार आहे. IPL मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या लीगमध्ये दोन नवीन संघ सामील झाले आहेत. त्यामुळे फॉर्मेटमध्येही बदल करण्यात आला असून 10 संघांची 5-5 अशा दोन गटात विभागणी करण्यात आली. या वेळी IPL मध्ये अंतिम फेरीसह एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. साखळी टप्प्यातील 70 सामने मुंबईतील तीन आणि पुण्यातील एक स्टेडियमवर खेळवले जातील, ज्याची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील संघर्षाने 26 मार्च रोजी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com