Asia Cup 2023 साठी दिल्लीत टीम इंडियाचा निर्णय? कॅप्टन रोहितही होणार रवाना

India Cricket Team: आशिया चषक आणि वर्ल्डकप या आगामी महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी दिल्लीत बीसीसीआय निवड समितीची बैठक होणार आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI selection committee led by Ajit Agarkar meeting in New Delhi to discuss India Asia Cup squad, captain Rohit Sharma will also attend:

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांचे संघ जाहीरही झाले आहेत. मात्र अद्याप भारतीय संघ जाहीर निश्चित झालेला नाही. याच दरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की सोमवारी (21 ऑगस्ट) दिल्लीत भारतीय संघाच्या निवड समीतीची बैठक होणार आहे.

अजित अगरकरच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीत आशिया चषकाबरोबरच भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीही भारतीय संघाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

आशिया चषकात भारतीय संघात खेळणारे बरेच खेळाडू वर्ल्डकप 2023 स्पर्धाही खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचमुळे आशिया चषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघावर सर्वांचे लक्ष आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: 'जडेजाचा तो कॅच...', रोहितने सांगितली वर्ल्डकपमधील अविस्मरणीय आठवण

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार निवड समितीच्या बैठकीसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित राहणार आहे. तसेच असे समजत आहे की भारतीय संघाची घोषणेला उशीर होण्याचे कारण काही मुख्य खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

बुमराहचे झाले पुनरागमन

दरम्यान, बुमराहने 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यातून 10 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. त्याने पुनरागमनातच दोन विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, त्याच्या पुनरागमनानंतर तो पुर्ण फिट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याची आशिया चषकासाठीची निवड पक्की मानली जात आहे.

मात्र, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या प्रमुख खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. हे दोघेही गेल्या काही काळापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांच्या दुखापतीवर काम करत होते. आता त्यांच्या फिटनेस रिपोर्टवर त्यांचे पुनरागमन अवलंबून असणार आहे.

Rohit Sharma
Team India: बुमराह, पंतसह 5 खेळाडूंचे BCCI ने दिले मेडिकल अपडेट्स, जाणून घ्या कोणाची काय स्थिती

भारतीय संघ श्रीलंकेत खेळणार

आशिया चषकातील सामने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवले जाणार आहे. पण भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेसाठी 23 ऑगस्ट रोजी भारतीय संघ श्रीलंकेला जाण्याची शक्यता आहे.

आशिया चषकात सुपर सिक्स फेरीसाठी भारताचा समावेश ए ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ संघासह करण्यात आला आहे. तसेच बी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका संघ आहेत.

सुपर सिक्स फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी होणार असून 4 सप्टेंबर रोजी नेपाळ संघाविरुद्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com