Ranji Trophy: 'रणजी'त होणार दिग्गजांची धमाकेदार एंट्री! शुभमन गिल, बुमराह आणि राहुल खेळणार देशांतर्गत क्रिकेट; BCCIचा मास्टरस्ट्रोक

Shubman Gill, KL Rahul & Jasprit Bumrah in Ranji Trophy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळने आगामी 2026-27च्या रणजी ट्रॉफी स्पर्धा अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
Shubman Gill, KL Rahul & Jasprit Bumrah in Ranji Trophy
Shubman Gill, KL Rahul & Jasprit Bumrah in Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

BCCI Mandates Ranji Trophy For Senior Players: भारतीय क्रिकेट नियामक मंडळने आगामी रणजी (2026-27) स्पर्धा अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. देशातील या सर्वात मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आता सर्व सिनियर आणि आघाडीच्या कसोटीपटूंना कमीत कमी एक सामना खेळणे बंधनकारक करण्यात आले. या नव्या नियमांमुळे तरुण खेळाडूंना त्यांच्या आवडत्या दिग्गजांसोबत खेळण्याची आणि शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, देशांतर्गत क्रिकेटचा स्तर आणखी उंचावणार आहे.

बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयामागे खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट आणि आगामी न्यूझीलंड दौरा ही दोन महत्त्वाची कारणे आहेत. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी बीसीसीआय अत्यंत सतर्क आहे. विशेषतः 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतातच झालेल्या कसोटी मालिकेत भारताला 0-3 अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले, ज्याची पुनरावृत्ती भारतीय संघ यावेळी टाळू इच्छितो. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने आगामी मालिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, खेळाडूंना रेड बॉल क्रिकेटची योग्य सवय असावी हा यामागचा उद्देश आहे.

Shubman Gill, KL Rahul & Jasprit Bumrah in Ranji Trophy
Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

या नियमानुसार, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल पंजाबकडून तर उपकर्णधार केएल राहुल कर्नाटककडून रणजी स्पर्धेत खेळताना दिसू शकतात. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही किमान एक सामना खेळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जरी त्याचे खेळणे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या मंजुरीवर आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर अवलंबून असेल. एकीकडे आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी यांसारख्या खेळाडूंवर विशेष लक्ष ठेवले जात आहे, तर दुसरीकडे बुमराह रणजी सामन्यात उपलब्ध न झाल्यास त्याला इंडिया 'ए'कडून एक प्रथम श्रेणी सामना खेळवण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला. या निर्णयामुळे केवळ कसोटी संघातील दिग्गजांची तयारी तगडी होईल असे नाही, तर रणजी सामन्यांमधील प्रेक्षकसंख्या आणि रोमांचही मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com