अबब! भारतातील देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत बंपर वाढ, BCCI ची मोठी घोषणा

बीसीसीआयने सर्व देशांतर्गत स्पर्धेच्या बक्षीस रकमेत अनेक पटींनी वाढ केली असून आता रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला तब्बल 5 कोटी रुपये मिळणार आहेत.
BCCI Domestic Cricket
BCCI Domestic CricketDainik Gomantak
Published on
Updated on

BCCI Domestic Prize Money: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत बपंर वाढ करण्यात आली आहे. याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर पोस्ट करत जाहीर केले. काही दिवसांपूर्वीच 2023-24 हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले होते. त्यानंतर आता बक्षीस रकमेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

भारतातील मानाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत जवळपास दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच विजय हजारे ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत तिप्पट वाढ झाली असून महिला क्रिकेटच्या बक्षीस रकमेतही तब्बल आठ पट वाढ झाली आहे.

जय शाह यांनी याबद्दल ट्वीट करताना लिहिले की 'मला सर्व बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ झाल्याचे घोषित करताना आनंद होत आहे. आम्ही देशांतर्गत स्पर्धेत अधिक गुंतवणूक करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार आहे. आता रणजी ट्रॉफी विजेत्यांना 2 कोटी ऐवजी 5 कोटी रुपये आणि वरिष्ठ महिला स्पर्धेतील विजेत्यांना 6 लाखाऐवजी आता 50 लाख रुपये दिले जाणार आहेत.'

BCCI Domestic Cricket
Video: IPL खेळणारे पहिले पिता-पुत्र! सचिन-अर्जुनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

दरम्यान, जय शाह यांनी जाहीर केल्याप्रामाणे रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 5 कोटी रुपये मिळणार आहे. तसेच उपविजेत्या संघाला यापूर्वी 1 कोटी रुपये मिळायचे आता 3 कोटी रुपये मिळणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 50 लाखाऐवजी आता 1 कोटी रुपये मिळणार आहेत.

तसेच इराणी कप स्पर्धेच्या विजेत्या संघाला आता 50 लाख रुपये आणि उपविजेत्या संघाला 25 लाख रुपये मिळणार आहेत. दुलीप ट्रॉफी विजेत्या संघाला आता 1 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये मिळणार आहेत.

याशिवाय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून विजेत्या संघाला 30 लाखाऐवजी आता 1 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 15 लाखाऐवजी 50 लाख रुपये मिळणार आहेत. सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी विजेत्या संघाला आता 25 लाखाऐवजी 80 लाख रुपये मिळणार आहे, तर उविजेत्या संघाला 10 लाखाऐवजी 40 लाख रुपये मिळणार आहेत.

त्याचबरोबर वरिष्ठ महिला वनडे ट्रॉफीसाठी विजेत्या संघाला आता 6 लाखाऐवजी 50 लाखाचे बक्षीस देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ महिला टी20 ट्रॉफी स्पर्धेच्या विजेत्या संघाला 5 लाखाऐवजी 40 लाख रुपये दिले जाणार आहे, तसेच उपविजेत्या संघाला 3 लाखाऐवजी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

BCCI Domestic Cricket
BCCI ची मोठी घोषणा! 2023-24 डोमेस्टिक क्रिकेट हंगामात होणार तब्बल 1846 सामने, पाहा टाईमटेबल

देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रकही जाहीर

भारताच्या 2023-2024 देशांतर्गत क्रिकेट हंगामात तब्बल 1846 सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामाला 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीने सुरुवात होईल. त्यानंतर 23 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान तब्बल तीन वर्षांनी प्रोफ. देवधर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे.

सईद मुश्ताक अली ट्रॉफी 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या दरम्यान होईल, त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2023 या दरम्यान खेळवली जाईल. तसेच 5 जानेवारी 2024 रोजी रणजी ट्रॉफीला सुरुवात होईल. ही स्पर्धा 14 मार्च 2024 पर्यंत चालेल.

तसेच 19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान वरिष्ठ महिला टी20 ट्रॉफी खेळवली जाईल. त्यानंतर 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 दरम्यान वरिष्ठ महिला आंतर विभागीय ट्रॉफी खेळवली जाईल. यानंतर 4 ते 26 जानेवारी 2024 दरम्यान वरिष्ठ महिला वनडे ट्रॉफी खेळवली जाईल. याशिवाय या हंगामात विविध वयोगटातील स्पर्धाही खेळवल्या जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com