Goa cricket: बडोद्यासमोर 'गोवा' नमला; पहिल्या दिवशी बडोदा 6 बाद 410

प्रारंभीच्या घसरगुंडीनंतर बडोद्याच्या 410 धावा
Sharjah Cricket Stadium
Sharjah Cricket StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या गोलंदाजांनी विशेषतः फरदीन खान याने सामन्याची सुरवात धडाक्यात केली, पण दिवसअखेर ते दमले. त्यामुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर शनिवारी बडोद्याने 6 बाद 410 धावा अशी मजबूत स्थिती गाठली.

( Baroda 410 for 6 on first day in Cooch Behar Trophy cricket match)

स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यास शनिवारपासून बडोदा येथील मोतीबाग क्रिकेट मैदानावर सुरवात झाली. गोव्याने नाणेफेक जिंकून यजमान संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. फरदीनने भन्नाट मारा करताना पहिल्या चौघांना बाद केले, त्यामुळे बडोद्याची 21 व्या षटकात 4 बाद 69 अशी घसरगुंडी उडाली. फरदीनला शानदार साथ देताना यष्टिरक्षक इझान शेख याने तीन झेल पकडले.

Sharjah Cricket Stadium
Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणाला...

बडोद्याने नंतर चिवट फलंदाजी केली. राजवीरसिंग जादव याच्या झुंजार शतकामुळे बडोद्याला मोठी धावसंख्या रचता आली. राजवीरसिंगने नाबाद 177 धावा केल्या. त्याने 264 चेंडूंतील खेळीत 20 चौकार व 2 षटकार मारले.

संघाला मजबूत स्थिती गाठून देताना त्याने भोईटे (83) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 155 धावांची, नंतर ध्रुव पटेल (73) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. दिवसअखेर नाबाद शतकवीराने पवन पटेल याच्यासमवेत 42 धावांची अभेद्य भागीदारी करून बडोद्याला चारशे धावांच्या पार नेले.

Sharjah Cricket Stadium
PAK vs ENG Final: पाकिस्तान... क्रिकेटच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध 'धर्मयुद्ध'?

संक्षिप्त धावफलक

बडोदा, पहिला डाव 91 षटकांत 6 बाद 410 (नित्य पांड्या 29, भविष्य पटेल 14, प्रियांशू मोलिया 18, राजवीरसिंग जादव नाबाद 177, मानव बेडेकर 0, भोईटे 83, ध्रुव पटेल 73, पवन पटेल नाबाद 15, फरदीन खान 18-4-63-4, राजन सरोज 7-3-29-0, यश कसवणकर 17.2-0-75-1, दीप कसवणकर 32-3-150-0, शिवांक देसाई 4-0-35-0, देवनकुमार चित्तेम 12.4-1-57-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com