T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Bangladesh Women T20 World Cup 2026: बांगलादेशच्या महिला संघाने मात्र आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर 'टी-20 विश्वचषक 2026' साठी दिमाखात प्रवेश मिळवला.
Bangladesh Women T20 World Cup 2026
Bangladesh Women Team Dainik Gomatak
Published on
Updated on

T-20 World Cup 2026: जागतिक क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशच्या पुरुष संघाने टी-20 विश्वचषक 2026 मधून माघार घेतल्याने क्रिकेट विश्वात चर्चा रंगली असतानाच, आता बांगलादेशच्या महिला संघाने मात्र आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर 'टी-20 विश्वचषक 2026' साठी दिमाखात प्रवेश मिळवला. पात्रता फेरीच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेश महिला संघाने थायलंडचा 39 धावांनी पराभव करत विश्वचषकाचे आपले तिकीट पक्के केले. या विजयामुळे बांगलादेशच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला असून महिला संघाने जागतिक स्तरावर आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

22 जानेवारी रोजी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि सलामीवीर दिलारा अख्तर शून्यावर बाद झाल्याने संघ दडपणाखाली होता. मात्र, त्यानंतर सलामीची यष्टीरक्षक फलंदाज जुऐरिया फर्दौस हिने संयमी फलंदाजी करत 45 चेंडूंमध्ये 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तिला शोभना मोस्तरीची उत्तम साथ लाभली, जिने 42 चेंडूंमध्ये 59 धावा कुटून संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. या दोघींच्या अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशने 20 षटकांत 8 बाद 165 धावांचा डोंगर उभा केला.

Bangladesh Women T20 World Cup 2026
T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या जागी टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची होणार एन्ट्री? पीसीबीच्या धमकीनंतर आयसीसी घेणार मोठा निर्णय

166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडच्या संघाला बांगलादेशच्या (Bangladesh) शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. थायलंडची सलामीवीर सुवानन खियाटो खातेही न खोलता बाद झाली. नत्थाकन चंथम (46 धावा) आणि नारुएमोल चाईवाई (30 धावा) यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण वाढत्या धावगतीच्या दबावामुळे थायलंडला 20 षटकांत 8 बाद 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासोबतच बांगलादेशने विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले.

Bangladesh Women T20 World Cup 2026
T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

विशेष म्हणजे, बांगलादेशसोबतच नेदरलँड्सच्या महिला संघानेही पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरुन इतिहास रचला आहे. आगामी महिला टी-20 विश्वचषक 12 जून 2026 पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार असून यामध्ये एकूण 12 संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com