Bajrang Punia: ''मी पद्मश्री पुरस्कार परत करतोय...''; बजरंग पुनियाचं PM मोदींना पत्र

Bajrang Punia: कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटू बजरंग पुनियाने मोठा निर्णय घेतला.
Bajrang Punia
Bajrang PuniaDainik Gomantak
Published on
Updated on

Bajrang Punia: कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटू बजरंग पुनियाने मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींना पत्र लिहिताना त्याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. काय करावे, कुठे जावे हे समजत नसताना आपण आपली रात्र रडत घालवली, असे पुनियाने आपल्या पत्रात म्हटले. ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पद्मश्री पुरस्कार परत करण्याबाबत माहिती दिली. त्याने पंतप्रधान मोदींना उद्देशून एक पत्र देखील पोस्ट केले, ज्यामध्ये तो ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीने निवडणूक जिंकल्यामुळे दुखावला गेला.

आपल्या पत्रात पुनियाने लिहिले की, “माननीय पंतप्रधान, आशा आहे की तुम्ही स्वस्थ असाल. तुम्ही देशसेवेत व्यस्त असाल. तुमच्या प्रचंड व्यस्त वेळापत्रकातून मला तुमचे लक्ष्य कुस्तीकडे वेधायचे आहे.'' त्याने पुढे लिहिले की, ''ब्रिजभूषण यांनी 21 डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवला. वर्चस्व आहे आणि वर्चस्व राहणारच, असे वक्तव्य त्यांनी केले. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीने पुन्हा कुस्तीचे व्यवस्थापन करणाऱ्या संघटनेवर दबदबा असल्याचा दावा केला आहे. याच मानसिक दडपणाखाली ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली.''

Bajrang Punia
Bajrang Punia Wins Gold: बजरंग पुनियाने कुस्तीत जिंकले सुवर्णपदक

त्याने पुढे लिहिले की, "सरकार आणि जनतेने मला खूप प्रेम दिले. 2019 मध्ये मला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारही मिळाला. हा सन्मान मिळाल्यावर मला खूप आनंद झाला होता. पण आज मी त्याहून अधिक दु:खी आहे. एकच कारण आहे, ज्या कुस्तीसाठी आम्हाला हा सन्मान मिळाला, आमच्या सहकारी महिला कुस्तीपटूंना त्यांच्या सुरक्षेसाठी कुस्ती सोडून द्यावी लागली आहे.''

Bajrang Punia
Sakshi Malik on work in Railways: 'ती बातमी खोटी', साक्षी मलिकचा आंदोलनातून माघार घेण्याबद्दल मोठा खुलासा

ज्या मुली बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अॅम्बेसेडर बनणार होत्या, त्यांना अशा परिस्थितीत टाकण्यात आले आहे की त्यांना त्यांच्या खेळापासून मागे हटावे लागले आहे, असेही पुनियाने आपल्या पत्रात म्हटले आहे. महिला कुस्तीपटूंचा अपमान झाल्यानंतर मी माझे आयुष्य सन्मानाने जगू शकणार नाही. असे जीवन मला आयुष्यभर त्रास देईल, म्हणून मी हा सन्मान तुम्हाला परत करत आहे, असेही पुढे पुनियाने लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com