Wrestlers Protest 2023: 'हो आम्ही नार्को टेस्टसाठी तयार...,' कुस्तीपटूंनी स्वीकारलं ब्रिजभूषण शरण सिंहचं आव्हान

WFI Chief Brij Bhushan on Polygraph Test: दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर गेल्या दोन महिन्यांपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.
Bajrang Punia & Vinesh Phogat & Sakshi Malik
Bajrang Punia & Vinesh Phogat & Sakshi MalikDainik Gomantak
Published on
Updated on

Wrestler Protest at Jantar Mantar: दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर गेल्या दोन महिन्यांपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. यातच आता, लैंगिक छळाचे आरोपी असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे आव्हान कुस्तीपटूंनी स्वीकारले आहे.

वास्तविक, ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंना नार्को टेस्ट करुन घेण्याचे आव्हान केले होते. त्यावर आता, कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून वक्तव्य समोर आले आहे. बजरंगने ब्रिजभूषण शरण सिंह यांचे आव्हान स्वीकारत असल्याचे म्हटले आहे.

बजरंग पुनियाने सांगितले की, 'तो नार्को टेस्टसाठी तयार आहे. महिला कुस्तीपटूही नार्को टेस्टसाठी तयार आहेत. मुख्य प्रशिक्षकाचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे.' बजरंग पुढे म्हणाला की, 'नार्को टेस्ट सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निगराणीखाली झाली पाहिजे, आम्ही सर्वजण नार्को टेस्ट करण्यास तयार आहोत.'

तर, महिला कुस्तीपटू विनेश फोगट म्हणाली की, 'मला ब्रिजभूषण शरण सिंह यांना सांगायचे आहे की, ज्या मुलींनी तक्रार केली आहे, त्या सर्व नार्को टेस्टसाठी तयार आहेत.

मात्र, ही टेस्ट लाइव्ह व्हायला हवी, जेणेकरुन संपूर्ण देशाला कळेल की, त्यांनी मुलींवर किती क्रूर अत्याचार केले आहेत.'

Bajrang Punia & Vinesh Phogat & Sakshi Malik
Wrestlers Protest: 'ब्रिजभूषण बहाण्याने पोट आणि छातीला...', महिला कुस्तीपटूंचे FIR मध्ये गंभीर आरोप!

दुसरीकडे, स्टार कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले की, 'आम्ही 23 मार्च रोजी इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढू. सायंकाळी 5 वाजता हा कँडल मार्च काढण्यात येणार आहे.' साक्षी पुढे म्हणाली की, 'जो कोणी इथे येऊन गोंधळ घालेल किंवा काही चुकीचे काम करेल, त्याला तो स्वतः जबाबदार असेल. इंडिया गेट हे आमच्या शहीदांचे ठिकाण आहे, म्हणून आम्ही तिथे जात आहोत. आम्ही आमच्या हद्दीत राहून तिथे कँडल मार्च काढू.'

याआधी, भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले होते की, 'मी सुद्धा नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल.

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही चौकशी झाली पाहिजे.' उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा आमदार पुत्र प्रतीक भूषण सिंह यांनी रविवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटमध्ये त्यांच्या वडिलांचा संदेश टॅग केला होता.

जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत देशातील नामवंत कुस्तीपटू सध्या 23 एप्रिलपासून दिल्लीच्या (Delhi) जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत.

या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक नामवंत कुस्तीपटूंचा समावेश आहे.

Bajrang Punia & Vinesh Phogat & Sakshi Malik
Wrestlers Protest at Jantar Mantar: जंतर-मंतरवर आंदोलक कुस्तीपटू अन् पोलिसांमध्ये धक्काबुक्की; गीता फोगाटचा भाऊही जखमी

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या संदर्भात चौकशी सुरु आहे.

कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे सर्व कार्यक्रम तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com