Pakistan Cricket Drama: पाकिस्तानी संघात मोठा राडा! 7 खेळाडूंच्या हकालपट्टीवर बाबर आझमचा खुलासा, म्हणाला, "मला काहीच खबर नव्हती..."

Babar Azam Unaware Of Pakistan Squad Changes: पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील अंतर्गत गोंधळ आणि तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
Babar Azam Unaware Of Pakistan Squad Changes
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

Babar Azam Unaware Of Pakistan Squad Changes: पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील अंतर्गत गोंधळ आणि तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. लॉर्ड्स कसोटीतील दारुण पराभवानंतर पाकिस्तान संघात करण्यात आलेल्या प्रचंड बदलांमुळे कर्णधार बाबर आझम स्वतः चक्रावून गेला. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बाबरने अत्यंत धक्कादायक खुलासा करत, संघ निवडीत किंवा 7 महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर काढण्याच्या निर्णयात आपल्याला अजिबात गृहीत धरले गेले नाही आणि कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती, असे उघडपणे स्पष्ट केले.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 194 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर पीसीबीने आक्रमक भूमिका घेत एकाच फटक्यात सात वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. इतकेच नव्हे तर मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांचीही तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी सात नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली, ज्यातील पाच जणांनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळलेला नाही. या सर्व घडामोडींची माहिती आपल्याला पीसीबीच्या (PCB) अधिकृत जाहीर प्रकटनानंतरच समजली, असे म्हणत बाबरने बोर्डाच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

Babar Azam Unaware Of Pakistan Squad Changes
Babar Azam: देशानं सोडलं, पण परदेशानं स्वीकारलं! पाकीस्तानचा बाबर आझम आता ऑस्ट्रेलियात खेळणार टी-20 क्रिकेट

संघात अचानक झालेल्या या बदलांमुळे आपण आश्चर्यचकित झालो होतो, हे मान्य करत बाबरने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. संघात नव्या दमाने उतरलेल्या तरुण खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह असून, मालिका गमावली असली तरी आता गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही, असे तो म्हणाला. 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या एजबेस्टन येथील तिसऱ्या कसोटीत पहिल्या सगळ्या गोष्टी विसरुन मुक्तपणे आणि आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला त्याने खेळाडूंना दिला.

Babar Azam Unaware Of Pakistan Squad Changes
Babar Azam Video Viral: बाबरनं डोक्यात बाटलीच हाणली असती... काय आहे हे 'झिम्बाबर झिम्बाबर' प्रकरण?

तथापि, पीसीबी आणि कर्णधार यांच्यातील बिघडलेले संबंध या घटनेमुळे जगासमोर आले आहेत. खेळाडूंचे गैरवर्तन आणि शिस्तभंगाच्या आरोपांवरुन बोर्डाने सुरु केलेल्या अंतर्गत चौकशीवरही बाबरने बोलणे टाळले. मालिका 0-2 ने गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता तिसऱ्या कसोटीत सन्मान वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, परंतु कर्णधारालाच अंधारात ठेवून निर्णय घेण्याच्या पीसीबीच्या या वृत्तीमुळे पाकिस्तानातील क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com