Babar Azam: बाबर आझमने रचला इतिहास, रोहित शर्माला मागे टाकत केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड!

Babar Azam Record: बाबर आझमने शनिवारी रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला आहे.
 Babar Azam
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

Babar Azam Record: बाबर आझमने शनिवारी रात्री न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला आहे.

कर्णधार म्हणून तो आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे, त्याने रोहित शर्माला मागे सोडले आहे.

बाबर आझमच्या नावावर आता क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 3 शतके आहेत. न्यूझीलंडपूर्वी त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध शतके झळकावली होती.

बाबरने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात 101 धावांची नाबाद इनिंग खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना 38 धावांनी जिंकला आणि या खेळीसाठी बाबरला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

कर्णधार म्हणून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

बाबर आझम (Babar Azam) - 3

रोहित शर्मा - 2

अॅरॉन फिंच - 1

शेन वॉटसन - 1

फाफ डू प्लेसिस - 1

 Babar Azam
Babar Azam ने अवॉर्डमध्येही केला रेकॉर्ड, क्रिकेटमधील योगदानासाठी...

यासह, बाबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पाकिस्तानच्या (Pakistan) या स्टार खेळाडूचे टी-20 क्रिकेटमधील हे एकूण 9 वे शतक आहे. यामध्ये त्याने अॅरॉन फिंच, मायकेल क्लिंगर आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडले आहे, ज्यांच्याकडे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 8-8 शतके आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 22 वेळा हा पराक्रम केला.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

ख्रिस गेल - 22

बाबर आझम - 9

अॅरॉन फिंच - 8

मायकेल क्लिंगर - 8

डेव्हिड वॉर्नर - 8

 Babar Azam
Babar Azam: जागतिक क्रिकेटवर बाबरचा दबदबा, विराट-रोहितला मागे टाकत रचला इतिहास!

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, बाबर आझमच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना 192 धावा करु शकला.

या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुण्या संघाला निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावाच करता आल्या. हरिस रौफने 4 बळी घेतले. पाकिस्तानने हा सामना 38 धावांच्या फरकाने जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com