बाबर आझम आशिया कपमध्ये इतिहास रचू शकतो, रोहित अन् कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड निशान्यावर

पाकिस्तान संघाची कामगिरी गेल्या काही काळापासून उत्कृष्ट आहे.
 Babar Azam
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया चषक 2022 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी आशिया चषक 20-20 च्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने सर्वाधिक वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे यावेळीही भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाची कामगिरी गेल्या काही काळापासून उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला या स्पर्धेत पाकिस्तानकडून नक्कीच कडवी टक्कर मिळू शकते आहे. 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपरहिट सामना खेळला जाणार आहे. (babar azam can create history in asia cup)

 Babar Azam
FC Goa : एफसी गोवाची ड्युरँड मोहीम उद्यापासून

आशिया कपमध्ये सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असतील, तर दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही असणार आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला तेव्हा आझम आणि रिझवान यांनी भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती आणि संघाला 10 विकेटने विजय मिळवून दिला होता आणि अशा स्थितीत त्या पराभवाचे भारतावर निश्चितच दडपण असेल.

बाबर आझमला रोहित आणि विराटला मागे टाकण्याची संधी

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बाबर आझमला रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकण्याची यावेळी संधी आहे. बाबरने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 26 अर्धशतके झळकावली आहेत तर अशा स्थितीत बाबरला रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील अर्धशतकांचा विक्रम मोडण्याची संधी असेल.

रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 27 अर्धशतके झळकावली आहेत तर बाबर जर आशिया चषकात जबरदस्त फॉर्ममध्ये राहिला तर नक्कीच तो या बाबतीत रोहितला देखील मागे टाकू शकतो. कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 30 अर्धशतके झळकावली आहेत, बाबरला विराटला मागे टाकण्यासाठी 5 अर्धशतके खेळावी लागणार आहेत.

 Babar Azam
भारतीय संघातील 'या' खेळाडूच्या पत्नीने केली PM मोदींकडे देशाचं नाव बदलण्याची मागणी

बाबर आझम, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे तिघेही एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी नक्कीच स्पर्धा करतील. रोहित आणि कोहलीचा आशिया चषक चांगला झाला नाही तर किमान अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत बाबरला या दोघांच्याही पुढे जाण्याची संधी नक्कीच आहे.

कोहली आणि रोहित आशिया चषकातही चमत्कार घडवू शकतात,

कोहली सध्या चागल्या फॉर्ममध्ये नसला तरी आशिया कपमध्ये त्याच्याकडून विशेष आशा आहेत. आशिया चषक स्पर्धेत कोहली आणि रोहित आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतील, तर भारताला विजेतेपद पटकावण्याची संधी यावेळी नक्कीच आहे.

बाबरला वनडेत इतिहास रचण्याची संधी आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबरने वनडेमध्ये आतापर्यंत 4442 धावा केल्या आहेत ज्यामध्ये 17 शतकांची नोंद करण्यात आली आहे. बाबर एकदिवसीय कारकिर्दीमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यापासून 558 धावांनी मागे आहे. बाबरने येत्या 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 558 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.

सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करण्याचा विक्रम हाशिम अमलाच्या नावावरती आहे. अमलाने 104 सामन्यांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या होत्या तर बाबरने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 89 सामने खेळले आहेत, म्हणजेच हा विक्रमही बाबरकडे आहे.

बाबर वनडेतील सर्वात वेगवान 20 शतकाचा विक्रमही आपल्या नावावर करू शकतो,

एवढेच नाही तर बाबरला वनडेत सर्वात वेगवान 20 शतक ठोकण्याचा विक्रम करण्याची संधी असणार आहे. आझमने आतापर्यंत वनडेमध्ये 17 शतके झळकावली आहेत. आमलाने 108 डावात 20 शतके पूर्ण केली होती तर बाबरने आतापर्यंत 89 एकदिवसीय सामन्यांच्या 87 डावांमध्ये 4442 धावा केल्या आहेत ज्यात 17 शतकांचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com