भारतीय संघातील 'या' खेळाडूच्या पत्नीने केली PM मोदींकडे देशाचं नाव बदलण्याची मागणी

भारतीय संघाच्या एका दिग्गज खेळाडूच्या पत्नीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सर्व भारतीयांनी हर घर तिरंगाच्या माध्यमातून तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. तर या अभियानाला देशवासियांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

दुसरीकडे भारतीय संघाच्या एका दिग्गज खेळाडूच्या पत्नीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या खेळाडूच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून हे आवाहन केले आहे.

भारताचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) देशाचे नाव बदलण्याचे आवाहन मोदींकडे केली आहे. हसीन जहाँने इन्स्टाग्रामवर तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे.

PM Modi
Ross Taylor चे दे धक्का तंत्र सुरुच, मुलतानच्या सुलतानबद्दल केला मोठा खुलासा

"माझा देश, माझा आदर. माझे भारतावर प्रेम आहे आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असावे. पंतप्रधान, माननीय गृहमंत्री यांना विनंती आहे की भारताचे नाव बदला, जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान म्हणेल, इंडिया नाही," असे हसीन जहाँने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com