Cricketer Retirement: फिंचपाठोपाठ आणखी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर निवृत्त! 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना

Shaun Marsh: फिंचपाठोपाठ आणखी एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा!
Australian Cricketer Shaun Marsh
Australian Cricketer Shaun MarshX/RenegadesBBL

Australian Cricketer Shaun Marsh announced retirement from professional cricket :

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शने रविवारी (14 जानेवारी) प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना बिग बॅश लीग २०२३-२४ हंगामात मेलबर्न रेनेगेड्सकडून बुधवारी (17 जानेवारी) सिडनी थंडर विरुद्ध खेळणार आहे.

विशेष म्हणजे शनिवारी (13 जानेवारी) रेनेगेड्सकडून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंचही क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. मेलबर्न स्टार्कविरुद्ध झालेल्या याच सामन्याच शॉन मार्शने रेनेगेड्सला विजय मिळवून देत फिंचला विजयी निरोपही दिला होता.

40 वर्षीय शॉन मार्शने गेल्या हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो टी20 क्रिकेट खेळत होता. दरम्यान, यंदाच्या बीबीएल हंगामात मार्श दुखापतीमुळे उशीरा खेळयला आला होता, पण असे असले तरी त्याने शानदार खेळ केला. त्याने पाच सामने खेळताना तीन अर्धशतके केली.

Australian Cricketer Shaun Marsh
Cricketer Retirement: एल्गार, वॉर्नरनंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या 'या' स्टार खेळाडूचाही कसोटीला अलविदा!

निवृत्ती घेण्याबद्दल मार्श म्हणाला, 'मला रेनेगेड्सकडून खेळताना मजा आली. मी गेल्या पाचवर्षात काही दिग्गजांना येथे भेटलो आणि आयुष्यभरासाठी मैत्रीचे नाते बनवले. हा संघ खास आहे. ते माझ्याशी खूप चांगले होते, शानदार संघसहकारी आणि त्यापेक्षाही चांगले मित्र आहेत.'

'आमचे सदस्य आणि चाहते, यांचे या प्रवासात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार. असेच आमच्याबरोबर राहा, या संघात खूप प्रतिभा आहे आणि मला याबद्दल कोणतीच शंका नाही की हा संघ पुन्हा अव्वल क्रमांकावर येईल.'

याशिवाय त्याने रेनेगेड्सच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानले. मार्श 2019-20 हंगामापासून रेनेगेड्सकडून खेळत आहे. त्याआधी तो पर्थ स्कॉचर्स संघाचा भाग होता.

याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मी स्कॉर्चर्ससाठी खूप कृतज्ञ आहे. पर्थमध्ये खेळतानाच्या माझ्याकडे काही गोड आठवणी आहेत. तिथेही खेळण्याचा मी खूप आनंद घेतला. सलग दोन विजेतेपदं जिंकणे हे माझ्यासाठी मैदानावर अनुभवलेले आनंददायक क्षण होते.'

Australian Cricketer Shaun Marsh
Aaron Finch: T20 वर्ल्डकप विजेत्या फिंचचा क्रिकेटला अलविदा, संघाने दिला विजयी निरोप

आकडेवारी

शॉन मार्शने त्याच्या टी20 कारकिर्दीत 215 सामने खेळताना 37.90 च्या सरासरीने 2 शतके आणि 57 अर्धशतकांसह 7050 धावा केल्या आहेत. यामध्ये 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा समावेश आहे, ज्यात त्याने 255 धावा केल्या. तसेच आयपीएलमध्ये त्याने 71 सामने खेळले असून एका शतकासह 2477 धावा केल्या आहेत.

मार्शने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 38 कसोटी सामने खेळताना 34.31 च्या सरासरीने 2265 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 73 वनडे सामने खेळताना 40.77 च्या सरासरीने 2773 धावा केल्या, ज्यात 7 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com