वॉर्नरला इंग्लंडची आली दया, ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा सांगितला मास्टर प्लॅन

संकटात सापडलेल्या इंग्लंडसाठी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मदतीचा हात पुढे केला आहे.
David Warner

David Warner

Dainik Gomantak

Published on
Updated on

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या वाईट वेळेतून जात आहेत. टीम सध्या ऑस्ट्रेलियात (Australia) असून अॅशेस मालिकेत सहभागी होत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने पहिले तीन कसोटी सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतल्याने मालिका त्याच्या हातातून गेली आहे. या मालिकेत इंग्लंडच्या (England) फलंदाजांनी निराशा केली आहे

David Warner

ऋषभ पंतने रचला इतिहास, महेंद्रसिंग धोनीचा मोडला विक्रम !

ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलान वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला यजमानांच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. मालिकेत अजून दोन सामने बाकी असून हे सामने जिंकून इंग्लंडला आपली विश्वासार्हता वाचवता येईल. संकटात सापडलेल्या इंग्लंडसाठी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मदतीचा हात पुढे केला आहे.

ऍशेस मालिका विजेत्या ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) पराभूत इंग्लंड क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाच्या (Australia) अतिरिक्त खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी सिंथेटिक विकेट्सवर सराव करण्याचा सल्ला दिला आहे. वॉर्नर म्हणाला, “फलंदाजीच्या दृष्टीकोनातून बाउन्स हा एक मोठा घटक आहे.

ऑस्ट्रेलियात लहानाचे मोठे झालो असल्याने या खेळपट्ट्यांवर खेळणे आमच्यासाठी इंग्लंडपेक्षा वेगळे आहे. मी इंग्लंड संघाला सिंथेटिक खेळपट्ट्यांवर सराव करण्याचा सल्ला देईन जेणेकरुन त्यांना या अतिरिक्त उसळीचा सामना करता येईल.

David Warner

हरभजन सिंग निवृत्तीनंतर या संघात होऊ शकतो सामील

ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर डावपेच काम करत नसल्यामुळे पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी शॉर्ट पिच चेंडू टाकून चूक केली, असे वॉर्नरने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना घरच्या मैदानावर अशा गोलंदाजांची सवय झाली आहे.

अॅशेस मालिकेत वॉर्नरने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली असली तरी त्याला शतक झळकावता आलेले नाही. दोनदा शतक झळकावताना तो हुकला. पहिल्या सामन्यात त्याने 94 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही तो आपला डाव 95 धावांच्या पुढे नेऊ शकला नाही.

David Warner

गोव्यात क्रिस्टियानो रोनाल्डोचा बसवला पुतळा

ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन आणि अॅडलेडमध्ये शानदार विजय मिळवले होते. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंडचे पुनरागमन होईल, असे वाटत होते, मात्र या सामन्यात इंग्लंडची अवस्था वाईट झाली.

पहिल्या डावात संघाला केवळ 185 धावा करता आल्या आणि दुसऱ्या डावात 100 च्या पुढे जाणे या संघाला कठीण झाले. दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या 68 धावांत आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि 14 धावांनी जिंकून मालिका जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com