ऋषभ पंतने रचला इतिहास, महेंद्रसिंग धोनीचा मोडला विक्रम !

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने (rishabh pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एक खास विक्रम केला आहे.
rishabh pant

rishabh pant

Twitter/ ANI

Published on: 
Updated on: 

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एक खास विक्रम केला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 100 वी कसोटी शिकार करुन भारताचा माजी दिग्गज महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) मागे टाकले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऋषभने (rishabh pant) दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ही अप्रतिम कामगिरी केली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (south africa) खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या दिवशी केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या दमदार सुरुवातीनंतर भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 327 धावांवर आटोपला. पावसामुळे दुसऱ्या दिवशी एकही षटक टाकता आले नाही. पहिल्या डावात भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ न धावाच करु शकला. भारताने 130 धावांची आघाडी घेतली. यादरम्यान भारतीय यष्टीरक्षक ऋषभने चार झेल घेत इतिहास रचला.

<div class="paragraphs"><p>rishabh pant</p></div>
हरभजन सिंग निवृत्तीनंतर या संघात होऊ शकतो सामील

पंतने मोडला धोनीचा विक्रम

सेंच्युरियनमध्ये पंतने विकेटमागे चार विकेट घेतल्या. त्याने चार फलंदाजांचे झेल घेत धोनीचा सर्वात जलद 100 बळींचा विक्रम मोडला. 26 कसोटी सामने खेळल्यानंतर त्याने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे असे करणारा सर्वात वेगवान भारतीय बनण्याचा विक्रम त्याने केला. धोनी आणि रिद्धिमान साहा यांनी 36 कसोटी सामने खेळून 100 बळी घेतले होते. किरण मोरेने यासाठी 39 सामने घेतले. नयन मोंगियाने हा टप्पा गाठण्यासाठी 41 सामने घेतले.

कसोटी क्रिकेटमध्ये पंतच्या नावावर 100 बळी

कसोटी क्रिकेटमध्ये पंतने 8 फलंदाजांना स्टंप करताना एकूण 93 झेल घेतले आहेत. अशाप्रकारे त्याने टेस्टमध्ये एकूण 100 बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. 90 कसोटी सामने खेळणाऱ्या धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 256 झेल घेतले तर 38 फलंदाजांना यष्टीचीत करुन माघारी पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com