Indian Women's Hockey Teams
Indian Women's Hockey TeamsANI

CWG 2022: भारतीय महिला हॉकी संघाने बर्मिंगहॅममध्ये फडकवला तिरंगा, न्यूझीलंडला हरवून जिंकले कांस्य

CWG 2022: महिला हॉकी संघाने तब्बल 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
Published on

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये, भारतीय महिला हॉकी संघांने आज कांस्यपदक आपल्या नावाने केलं आहे. या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते आज भारतीय महिला संघाने शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव करून कांस्यपदक जिंकले आणि सामना पूर्ण वेळेत 1-1 असा संपवला.

महिला हॉकी संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आज न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात भारताने बाजी मारली आहे. पूर्ण वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला, पण पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने आश्चर्यकारक कामगिरी केली. कर्णधार सविता पुनियाचा जबरदस्त सेव्ह आणि सोनिका-नवनीतच्या गोलच्या जोरावर भारताने शूटआऊटमध्ये 2-1 असा विजय मिळवला. महिला हॉकी संघाने तब्बल 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com