Australia Test Team
Australia Test TeamAFP

NZ vs AUS: न्यूझीलंडला व्हाइटवॉश देत ऑस्ट्रेलियाची WTC पाँइंट्सटेबलमध्येही मोठी झेप, टीम इंडियाला देणार टक्कर

Australia Whitewash New Zealand in Test Series: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत व्हाइटवॉश दिला. या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेतही बदल झाले आहेत.
Published on

Australia Clean Sweep New Zealand in Test Series

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सोमवारी (11 मार्च) न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत न्यूझीलंडला 2-0 अशा फरकाने व्हाइटवॉश दिला.

ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे या मालिकेनंतर टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने आता न्यूझीलंडला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

Australia Test Team
WTC Points Table: धरमशाला विजयानंतर भारताला मोठा फायदा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मागे टाकत घेतली आघाडी

या विजयामुळे ऑस्ट्रलियाची विजयी टक्केवारी 62.50 झाली आहे. या टक्केवारीसह त्यांनी भारतापाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवला. भारतीय संघ गुणतालिकेत 68.51 च्या विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे आगामी काळात अव्वल क्रमांकासाठी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात चूरस दिसू शकते.

तसेच न्यूझीलंडला मात्र या पराभवामुळे नुकसान झाले आहे. न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. न्यूझीलंडची टक्केवारी घसरून आता 50 झाली आहे.

न्यूझीलंडचा पराभव

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 279 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 80 धावांवरच 5 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु नंतर मिचेल मार्श आणि ऍलेक्स कॅरे यांनी केलेल्या 140 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणले.

Australia Test Team
NZ vs AUS: लायनचा बॅटिंगमध्ये विश्वविक्रम, तर फिलिप्सने 5 विकेट्ससह न्यूझीलंडमध्ये 16 वर्षांनी केला 'तो' पराक्रम

दरम्यान मार्श 80 धावांवर बाद झाल्यानंतरही न्यूझीलंडला तळातल्या फलंदाजांना बाद करत विजय मिळवण्याची संधी होती. मात्र कर्णधार पॅट कमिन्सने कॅरेला भक्कम साथ देताना 8 व्या विकेटसाठी नाबाद 61 धावांची भागीदारी केली.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 65 षटकात 7 विकेट्स गमावत 281 धावा करत विजय निश्चित केला. कॅरे 123 चेंडूत 98 धावा करून नाबाद राहिला. तसेच कमिन्स 32 धावांवर नाबाद राहिला.

या सामन्यात पहिल्या डावात न्यूझीलंड 162 धावांच सर्वबाद झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 256 धावा करून 94 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने चांगली कामगिरी करताना सर्वबाद 372 धावा केल्या होत्या. पण पहिल्या डावातील 94 धावांच्या पिछाडीमुळे न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियासमोर 279 धावांचे आव्हान ठेवता आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com