Australia vs Denmark: डेन्मार्कला नमवून ऑस्ट्रेलिया 'राऊंड ऑफ 16'मध्ये

1-0 गोलफरकाने मात; मॅथ्यू लेकी याने नोंदवला गोल
Australia vs Denmark:
Australia vs Denmark:Dainik Gomantak
Published on
Updated on

Australia vs Denmark: फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बुधवारी (30 नोव्हेंबर) रोजी ग्रुप डी मधील डेन्मार्क विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना चुरशीचा झाला. पुढील फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित राहिला तरी चालणार होते, पण ऑस्ट्रेलियाने हा सामना 1-0 ने जिंकला.

(FIFA WorldCup 2022)

Australia vs Denmark:
Shikhar Dhawan: गब्बरची मोठी घोषणा, या दौऱ्यापासून भारत वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु करणार!

पुर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने गोलसाठी चार प्रयत्न केले, त्यातील तीन टारगेटवर होते. पण गोल करण्यात संघ यशस्वी झाला नाही. डेन्मार्कने पुर्वार्धात चेंडुवरील नियंत्रण 66 टक्के होते. डेन्मार्कने गोलसाठी पाचवेळा प्रयत्न केला, त्यांचे दोनच शॉट टारगेटवर होते. पण त्यांनाही पुर्वार्धात गोल करता आला नाही. ऑस्ट्रेलियापेक्षा डेन्मार्कचा खेळ जास्त आक्रमक होता.

उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू लेकी याने गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे ऑस्ट्रेलिया संघ ग्रुप डी मध्ये पहिल्या दोन संघात पोहचला आहे.

Australia vs Denmark:
ICC Rankings: श्रेयस अय्यर अन् शुबमन गिलला लागली लॉटरी, ICC क्रमवारीत मोठा फायदा

या सामन्यापुर्वी ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर डेन्मार्क तिसऱ्या स्थानी होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकू किंवा मरू अशा स्थितीचा होता. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीत आणि पराभूत संघ स्पर्धेबाहेर, अशी स्थिती असल्याने सामना चुरशीचा झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णित राखला तरी त्यांचा पुढील फेरीत प्रवेश निश्चित्त होणार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com