Australia announced preliminary ICC Cricket World Cup 2023 squad: भारतात यावर्षी 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. हे वनडे वर्ल्डकपचे 13 वे पर्व आहे. आता दोन महिन्यांहूनही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया 18 खेळांडूंचा प्राथमिक संघांची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाने या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेला लेग स्पिनर तन्वीर संघा आणि अननुभवी अष्टपैलू ऍरॉन हार्डी यांचा समावेश करत सर्वांना चकीत केले आहे. तसेच कसोटी संघातील स्टार फलंदाज मार्नस लॅब्युशेनला या संघातून वगळले आहे.
आयसीसी नियमानुसार वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी 28 सप्टेंबर पर्यंत सहभागी देशांना अंतिम संघ जाहीर करायचा आहे.
दरम्यान, या वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सच करणार आहे. पण त्यापूर्वी त्याला 6 आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे. कमिन्सच्या डाव्या हाताच्या मनगटाला ऍशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
त्यामुळे गोलंदाजी करताना जरी काही समस्या नसली, तरी फलंदाजी करताना मात्र, ही मोठी जोखीम आहे. त्याचमुळे त्याला 6 आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी सांगितले की कमिन्सच्या डाव्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून त्याला त्यातून सावरण्यासाठी 6 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.'
तसेच बेली यांनी सांगितले की कमिन्स वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी काही सामने खेळू शकतो, जे त्याला तयारी करण्यास पुरेसे असतील.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला 5 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातून तन्वीर आणि हार्डी पदार्पण करण्याची शक्यता आहे. तन्वीर यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्य टी20 संघात होता, पण त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला सामना भारताविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा प्राथमिक संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.