World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 212 धावांनी गारद झाला. आफ्रिकन संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने कांगारु गोलंदाजांविरुद्ध शानदार कामगिरी करत 101 धावा केल्या.
मिलरच्या या शानदार शतकाच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत शतक झळकावणारा डेव्हिड मिलर पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला.
मिलर व्यतिरिक्त, हेन्रिच क्लासेनने आपल्या संघासाठी 47 धावांची खेळी खेळली, तर या दोघांशिवाय इतर सर्व फलंदाजांना 20 धावांचा टप्पा देखील गाठता आला नाही. हा संघ कांगारुंच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करलेला दिसला, एवढी कमी धावसंख्या करुनही हा संघ 49.4 षटके खेळत राहिला, जे आश्चर्यकारक होते.
दरम्यान, डेव्हिड मिलरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) शानदार खेळी खेळत आपल्या संघाला सावरले. 24 धावांत प्रोटीज संघाने 4 विकेट गमावल्या असताना तो फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा शानदारपणे सामना केला.
त्याने 116 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. या विश्वचषकात मिलरचे हे पहिलेच शतक असून तेही अत्यंत कठिण परिस्थितीत त्याने संघासाठी ही महत्त्वाची खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर मिलरने 44 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला.
आता, डेव्हिड मिलर एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत 6 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज कॉलिस किंग यांच्या नावावर होता, ज्यांनी 1979 मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) 86 धावांची खेळी केली होती. या यादीत तिसऱ्या स्थानावर स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आहे, ज्याने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 77 धावा केल्या होत्या.
101 धावा – डेव्हिड मिलरविरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)
86 धावा - कॉलिस किंगविरुद्ध इंग्लंड (1979)
77 धावा - रवींद्र जडेजाविरुद्ध न्यूझीलंड (2019)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.