ISL Final Goa 2022-23: गोव्यात रंगणार एटीके वि. बंगळुरु संघात फायनलचा थरार, जाणून घ्या डिटेल्स

ATKMB vs BFC: इंडियन सुपर लीगचा अंतिम सामना यंदा गोव्यात रंगणार आहे.
ATKMB vs BFC | ISL 2023
ATKMB vs BFC | ISL 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League Final Goa 2022-23: इंडियन सुपर लीग 2022-23 स्पर्धेत सोमवारी एटीके मोहन बगानने अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे. सोमवारी सॉल्ट लेक स्टेडियमवर हैदराबाद एफसी विरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लेगच्या सामन्यात विजय मिळवत त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला.

रोमांच झालेल्या या सामन्यात एटीकेने पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-3 अशा फरकाने गतविजेत्या हैदराबादला पराभूत केले. या सामन्याच्या निर्धारित 120 मिनिटानंतरही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते.

अखेर हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शुटआऊटमध्ये एटीकेने बाजी मारत अंतिम सामना गाठला.

पहिल्या लेगमधील एटीके आणि हैदराबाद संघातील सामनाही 0-0 अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला होता.

ATKMB vs BFC | ISL 2023
ISL 2022-23: मुंबई सिटी घरच्या मैदानावर उचलणार लीग शिल्ड, लोकल बॉय राहुल भेके म्हणतोय...

दरम्यान, पेनल्टी शुटआऊटमध्ये एटीकेचा कर्णधार प्रितम कोटलचा गोल विजय मिळवून देणारा ठरला, कारण त्यापूर्वी हमीलकडून गोल करण्यात अपयश आले होते. तसेच या पेनल्टी शुटआऊटमध्ये एटीचा गोलकिपर विशाल कैथ याची कामगिरीही महत्त्वाची ठरली.

पेनल्टी शुटआऊटमध्ये एटीकेकडून प्रितम व्यतिरिक्त दिमित्री पेट्राटोस, फेडेरिको गॅलेगो आणि मानवीर सिंग यांनी गोल केले.

तसेच हैदराबादकडून जोआ विक्टर, दानू आणि रिगन यांनी गोल केले होते. मात्र, झेवियर सिवेरिओ आणि बार्थोलोम्यू ऑग्बेन्शे यांचा निशाणा योग्य बसला नाही आणि एटीकेने विजयावर शिक्कामोर्तब केले.

ATKMB vs BFC | ISL 2023
ISL 2022-23: सुनील छेत्रीच्या गोलने ड्रामा! केरला ब्लास्टर्सने चालू सामन्यात सोडलं मैदान, नक्की झालं काय?

बंगळुरूही अंतिम सामन्यात

आता एटीकेचा अंतिम सामना बंगळुरू एफसीविरुद्ध होईल. बंगळुरूने लीग शिल्ड विनर मुंबई सिटी एफसीला उपांत्य फेरीच्या दोन्ही लेग सामन्यांमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.

गोव्यात रंगणार अंतिम सामना

आता एटीके आणि बंगळुरू यांच्यात अंतिम सामन्यात तगड्या लढतीची चाहत्यांना अपेक्षा आहे. हा अंतिम सामना 18 मार्च रोजी गोव्यात पार पडणार आहे. गोव्यातील फातोर्डा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु या मैदानावर हा अंतिम सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, प्रशिक्षणासाठी उपलब्ध मैदान व पायाभूत सुविधांमुळे गोव्यातील मैदानाची निवड करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com