'हौशी' बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा एथनला ब्राँझपदक

भाऊ एड्रिक यानेही स्पर्धेत चमक दाखविली.
 Chess Tournament
Chess TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय हौशी बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा दहा वर्षी एथन वाझ याने ब्राँझपदक जिंकले. त्याचा भाऊ एड्रिक यानेही स्पर्धेत चमक दाखविली. त्याला पंधरावा क्रमांक मिळाला.

जयपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने राजस्थान बुद्धिबळ संघटना आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली होती. स्पर्धेत एकूण 455 खेळाडूंनी भाग घेतला. त्यात 1700, 2000, 2300 एलो गुणांखालील खेळाडूंचा सहभाग होता.

 Chess Tournament
11 वर्षीय मुलीवर बलात्कार, यूपीच्या युवकाला अटक

एथनने 2000 एलो गुणांखालील गटात भाग घेतला. त्याचे सध्या 1792 एलो गुण आहेत. स्पर्धेत तो नऊ मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळला. त्यापैकी दोघांविरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला. एथनला पराजित केलेल्या प्रदीप तिवारी याने सुवर्ण, तर अपूर्व कांबळे याने रौप्यपदक जिंकले. राष्ट्रीय हौशी बुद्धिबळ स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे एथनला आता आशियाई, तसेच जागतिक हौशी बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे.

 Chess Tournament
चेन्नई पर्यटक हत्येप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

एड्रिकने नोंदविले सात गुण

एलो मानांकनात एड्रिक याचे सध्या 1269 गुण आहेत. तो 1700 एलो गुणांखालील गटात खेळला. त्याने सात गुण नोंदविले. संयुक्त सातवा क्रमांक मिळाल्यानंतर त्याला टायब्रेकर गुणांत 15 वा क्रमांक प्राप्त झाला. एड्रिक तेरा वर्षीय आहे. या स्पर्धेत त्याने तिघा मानांकित खेळाडूंना हरविले. त्यामुळे त्याला स्पर्धेतून 96 एलो गुणांची कमाई करता आली. तो आशियाई, जागतिक हौशी बुद्धिबळ स्पर्धेत विशेष प्रवेशिकेद्वारे खेळू शकेल. एथन व एड्रिक दोघेही सां जुझे द आरियल येथील द किंग्ज स्कूलचे विद्यार्थी असून मडगाव येथील चेस गुरु गोवा अकादमीत प्रकाश सिंग यांचे मार्गदर्शन लाभते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com