चेन्नई पर्यटक हत्येप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

पर्यटकांना मारहाण झाल्याने मृत्यू झाला होता
Colva Murder Case
Colva Murder CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : मूळ चेन्नई येथील मदन जे या 29 वर्षीय पर्यटकाचा कोलवा येथे खून केल्याचा आरोप असलेल्या दोन बाऊन्सर्सची दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्षाद आगा यांनी निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्त केलेल्या बाऊन्सर्सची नावे बासिलो राताव उर्फ पोकोड आणि झेव्हीयर डिसोझा अशी असून 13 जानेवारी 2013 रोजी रात्री त्यांनी कोलवा येथील एका हॉटेलवर आलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याने त्यातून ही हत्या झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Colva Murder Case
11 वर्षीय मुलीवर बलात्कार, यूपीच्या युवकाला अटक

न्यायालयात त्यांची बाजू ऍड. बायरन रोड्रीग्स व एड. रवी कोलवाळकर यांनी मांडली.
या प्रकरणी गोपीनाथ ए. या पर्यटकाने कोलवा पोलिसांत तक्रार दिली होती. चेन्नईहुन गोव्यात आलेला युवा पर्यटकांचा एक गट कोलवा येथील हॉटेल बुमरंग येथे आला असता दिलेली ऑर्डर येण्यास उशिर केल्याने त्यांनी व्हेटरकडे हुज्जत घालण्यास सुरवात केली.

यावेळी तिथे बाऊन्सर्स म्हणून काम करणाऱ्या वरील दोघांनी त्यांना ओढत कोलवा समुद्र किनाऱ्यावर आणून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी मदन या पर्यटकाच्या पोटात पोकोड याने सुरा खुपसल्याने रक्तस्राव होऊन त्याचे निधन झाले असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 14 साक्षीदार पेश करण्यात आले मात्र संशयितावरील गुन्हे सिद्ध होण्याइतपत पुरावे समोर येऊ न शकल्याने दोघांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com