Goa Chess Competition : श्रीमती तारामती कांदोळकर स्मृती गोवा राज्यस्तरीय 12 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत एथन वाझ याने खुल्या, तर जेनिसा सिक्वेरा हिने मुलींत विजेतेपद मिळविले. अपराजित राहिलेल्या एथनने सहापैकी सहा, तर जेनिसाने पाच फेऱ्यांत साडेचार गुण नोंदविले. (Athena, Janissa won the Goa State Chess Championship)
तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिर सभागृहात झाली. या स्पर्धेतील दोन्ही गटात पहिले दोन क्रमांक मिळविलेले खेळाडू राष्ट्रीय 12 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत (Goa Chess Competition) गोव्याचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धा 9 ते 14 एप्रिल या कालावधीत कर्नाटकातील मंड्या येथे होईल.
खुल्या गटात अभीर प्रभू याने पाच गुणांसह, तर मुलींत साईजा देसाई हिने चार गुणांसह उपविजेतेपद मिळविले. खुल्या गटात वेदांत आंगले, राजवीर पाटील, साईराज नार्वेकर, कविश बोरकर यांना, मुलींत वैष्णवी परब, दिया सावळ, श्रमा मुरुडकर, श्रीवल्ली गांधी, तिसवाडी तालुका पातळीवर आठ वर्षांखालील गटात प्रचेत मालवणकर, जोशुआ तेलिस, श्रेयश हवाल, लिया सिल्वेरा, अवनी सावईकर, म्युरियल फर्नांडिस यांना बक्षिसे मिळाली.
महेश कांदोळकर, गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक, समन्वयक सचिन आरोलकर, आशेष केणी, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, आतिश आंगले, प्रकाश सावंत, नरेश पेडणेकर, हेरंब प्रभुदेसाई, संदेश आमोणकर, गिरिधर फडते, नंधिनी म्हामल यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.