Asian Games 2023: महिलांच्या भालाफेकमध्ये भारताने जिंकले 'गोल्ड', अन्नू राणी हांगझोऊमध्ये चमकली

Asian Games 2023: भारताच्या अन्नू राणीने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
 Annu Rani
Annu Rani Dainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games 2023: भारताच्या अन्नू राणीने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. चौथ्या प्रयत्नात तिने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली आणि 62.92 मीटर भाला फेकला.

श्रीलंकेच्या नदीशा दिलहानने रौप्यपदक जिंकले. यासह अन्नू एशियाडमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेकमध्ये भारतीयाने सुवर्णपदक पटकावण्याची 72 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

फायनलमध्ये काय झालं?

अन्नूने अंतिम फेरीत आपल्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. सर्व खेळाडूंना अंतिम फेरीत सहा प्रयत्न दिले जातात. यापैकी सर्वोत्तम प्रयत्नांची गणना केली जाते आणि त्या आधारावर पदके निश्चित केली जातात.

अन्नूचा पहिला प्रयत्न 56.99 मीटर, दुसरा प्रयत्न 61.28 मीटर आणि तिसरा प्रयत्न 59.24 मीटर होता. तोपर्यंत ती दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होती. यानंतर चौथ्या प्रयत्नात अन्नूने 62.92 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला.

तिचा पाचवा प्रयत्न 57.66 मीटर होता, मात्र शेवटचा तिचा प्रयत्न फाऊल गेला. दुसरीकडे, श्रीलंकेच्या (Sri Lanka) दिलहान नदिशाने 61.57 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह दुसरे स्थान पटकावले आणि रौप्यपदक जिंकले. दरम्यान, चीनच्या हुइहुई लिऊने 61.29 मीटर फेकसह तिसरा क्रमांक पटकावला.

 Annu Rani
Asian Games 2023: भारताने हॉकीमध्ये बांगलादेशचा उडवला धुव्वा, उपांत्य फेरीत चीनशी मुकाबला!

एशियाडमध्ये भालाफेकमध्ये आतापर्यंतचे पदक विजेते

महिलांची भालाफेक ही स्पर्धा 1951 पासून आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग आहे. एशियाडमध्ये महिलांच्या भालाफेक स्पर्धेत एकूण सहा पदके (अन्नूच्या सुवर्णासह) जिंकली आहेत.

याआधी बार्बरा वेबस्टरने 1951 दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक, एलिझाबेथ डेव्हनपोर्टने 1958 टोकियो आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, एलिझाबेथ डेव्हनपोर्टने 1962 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक, गुरमीत कौरने 1998 बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि अन्नू राणीने 1958 च्या टोकियो आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. आता अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे तिचे दुसरे पदक आहे.

 Annu Rani
Asian Games 2023: शेतकऱ्याच्या पोरीची चमकदार कामगिरी, पारुल-प्रीतीने भारतासाठी जिंकले पदक

अन्नू राणीची कामगिरी

अन्नूने भालाफेकमधील अनेक स्पर्धांमध्ये भारताला यश मिळवून दिले आहे. महिलांच्या भालाफेकमध्ये ती 'राणी' आहे. या स्पर्धेत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला आहे. अन्नू 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics) पात्र ठरली.

याशिवाय, राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. अन्नूने 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले.

याशिवाय भुवनेश्वर येथे झालेल्या 2017 आशियाई स्पर्धेत कांस्य आणि दोहा येथे झालेल्या 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले. अन्नूने 2016 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com