Asian Champions Trophy Hockey India vs Pakistan: भारतात सध्या आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धा चेन्नईमध्ये खेळवली जात आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाचा या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
भारताने यापूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. तसेच पाकिस्तानचे स्थान मात्र अद्याप उपांत्य फेरीत निश्चित नाही.
भारतीय संघ या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित राहिला आहे. भारतीय संघाने पहिल्या चार साखळी सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे भारतीय संघ १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.
तसेच पाकिस्तान संघाचे ५ गुण आहेत. त्यांना पहिल्या चार साखळी सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळला असून, त्यांनी १ पराभव स्विकारला आहे. तसेच २ सामने बरोबरीत सुटला आहे.
भारतील संघ सध्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 16 व्या क्रमांकावर आहेत. गेल्या 15 सामन्यांमध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत. तसेच 2 सामने बरोबरीत सुटले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
याशिवाय पाकिस्तानने भारताला गेल्या 7 वर्षात पराभूत केलेले नाही. यापूर्वी पाकिस्तानने भारताला अखेरचे 2016 साली गुवाहाटीला झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते.
तसेच या दोन संघात अखेरचा सामना 2022 च्या आशिया कप स्पर्धेत झाला होता. ज्यात 1-1 अशी बरोबरी झाली होती. या वर्षातील ही या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पहिलाच सामना असणार आहे.
हा सामना चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना चाहते स्टार स्पोर्ट्स आणि फॅन कोड यावर लाईव्ह पाहू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.