आशिया चषक स्पर्धेत कोणाचा दबदबा, भारत-पाकिस्तान 13 वेळा आले आमनेसामने; जाणून घ्या रेकॉर्ड

India vs Pakistan: आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे.
Babar And Rohit
Babar And Rohit Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan: आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा 14 वा सामना असेल.

यापूर्वी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला कोणत्या संघाचा वरचष्मा राहीला आहे त्याबद्दल सांगणार आहोत.

7 वेळा भारताने तर 5 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला

भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील 13 सामन्यांमध्ये टीम इंडियाने सात वेळा विजय मिळवला आहे, तर पाच वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

या पार्श्‍वभूमीवर आशिया चषकातही टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. आणि आता दोन्ही संघ 14व्यांदा आमनेसामने येणार आहेत.

Babar And Rohit
India vs Pakistan: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! नो-बॉलवर विकेट अन्...

भारत चॅम्पियन होणार

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत चॅम्पियन बनण्यासोबतच सामना जिंकण्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या पुढे दिसतो. दोन्ही संघांनी आतापर्यंत 12 आशिया चषक स्पर्धा खेळल्या आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने (Team India) 6 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे.

टीम इंडियाने 1984, 1988, 1990, 1995, 2010 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानने 2000 आणि 2008 मध्ये विजेतेपद पटकावले आहे.

Babar And Rohit
India vs Pakistan: भारताचा दारुण पराभव! इमर्जिंग आशिया चषकावर पाकिस्तानने दुसऱ्यांदा कोरले नाव

रोहित-बाबर कर्णधारपदाची धुरा सांभाळतील

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना श्रीलंकेतील तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. जिथे टीम इंडियाची कमान हिटमॅन रोहित शर्माकडे असेल. तर पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

गोलंदाजी आणि फलंदाजीत दोन्ही संघ यावेळीही एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसत आहेत. अशा स्थितीत ही स्पर्धा रंजक होण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com