India vs Pakistan: भारताचा दारुण पराभव! इमर्जिंग आशिया चषकावर पाकिस्तानने दुसऱ्यांदा कोरले नाव

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया चषक 2023 च्या विजेतेपदाचा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला.
Emerging Asia Cup 2023
Emerging Asia Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया कप 2023 जिंकण्याचे भारत A चे स्वप्न रविवारी भंगले. भारतीय संघाला अंतिम सामन्यात पाकिस्तान A संघाकडून 128 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानला विजेतेपद राखण्यात यश आले.

कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने 353 धावांचे मोठे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 40 षटकांत 224 धावांवर गारद झाला. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्मा (61) याने सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार यश धुलने 39 आणि साई सुदर्शनने 29 धावा केल्या.

या तिघांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला 15 चा आकडाही पार करता आला नाही. पाकिस्तानकडून (Pakistan) सुफियान मुकीमने तीन तर अर्शद इक्बाल आणि मुबासिर खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 352 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून तय्यब ताहिरने (71 चेंडूत 108) शतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्याच्याशिवाय, सॅम अयुब (59), साहिबजादा फरहान (65) यांनी अर्धशतके ठोकली. फरहान रनआऊट झाला. त्याचवेळी, मुबासिरने 35 धावांचे योगदान दिले.

भारताकडून (India) राजवर्धन हंगारगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मानव सुथार, निशांत सिंधू आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Emerging Asia Cup 2023
Emerging Teams Asia Cup 2023 Final: पाकिस्तानने टीम इंडियाला दिले 353 धावांचे टार्गेट, तय्यब ताहिरने ठोकले शानदार 'शतक'

दुसरीकडे, इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा दुसरा सामना होता. जेव्हा हे दोन संघ प्रथमच आमनेसामने आले तेव्हा सुदर्शनच्या शतकामुळे भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा 8 विकेट्सने पराभव केला होता.

विशेष म्हणजे, या स्पर्धेचा हा पाचवा सीझन आहे. आतापर्यंत ही स्पर्धा 23 वर्षांखालील म्हणून चार वेळा खेळली गेली. 2013 मध्ये भारत पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता.

यानंतर 2017 आणि 2018 मध्ये श्रीलंकेने बॅक टू बॅक जेतेपद पटकावले. 2023 पूर्वी, 2019 मध्ये इमर्जिंग आशिया कप आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये पाकिस्तान चॅम्पियन बनला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com