Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

Rohit Sharma: हिटमॅन ऑन फायर! सलग तिसरी फिफ्टी अन् रोहितने 4 मोठे रेकॉर्ड करत दिग्गजांना टाकलं मागे

India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्ध चौकार ठोकत रोहितने अर्धशतक पूर्ण केले, हे त्याचे आशिया चषकातील सलग तिसरे अर्धशतक ठरले.
Published on

Asia Cup 2023 Super Four India vs Sri Lanka Rohit Sharma Fifty Records:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरीत मंगळवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात सामना होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक केले आहे. याबरोबच त्याने काही मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनीही चांगली सुरुवात करताना अर्धशतकी भागीदारी. मात्र 80 धावांच्या भागीदारीनंतर गिल 19 धावांवर बाद झाला.

त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला होता. त्याच्याबरोबर फलंदाजी करत असताना रोहितने 13 व्या षटकात मथिशा पाथिरानाविरुद्ध चौकार ठोकत 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे यंदाच्या आशिया चषकातील सलग तिसरे अर्धशतक ठरले आहे.

पण त्याच्या अर्धशतकानंतर विराट कोहली 3 धावांवर बाद झाला, तर लगेचच रोहितही बाद झाला. रोहितने 48 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या तिन्ही विकेट्स दुनिथ वेलालागेने घेतल्या.

रोहितने घातली ४ मोठ्या विक्रमांना गवसणी

  • 10 हजार धावा

रोहितने हे अर्धशतक करताना वनडेमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने 241 व्या वनडे डावात खेळताना हा कारनामा केला आहे. त्यामुळे तो विराट कोहलीनंतर सर्वात जलद 10 हजार वनडे धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सचिनने 259 वनडे डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर असेलल्या विराटने 205 वनडे डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

तसेच रोहित वनडेत 10 हजार धावांचा टप्पा पार करणारा भारताचा एकूण सहावा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (18426), विराट कोहली (13027), सौरव गांगुली (11363), राहुल द्रविड (19889) आणि एमएस धोनी (10773) या भारतीय खेळाडूंनी वनडेत 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: 'वर्ल्डकपमध्ये शर्मा अन् कोहलीही करणार बॉलिंग...', कर्णधार रोहितचं मोठं भाष्य
  • सलामीवीर म्हणून विश्वविक्रम

याशिवाय रोहितने सलामीवीर म्हणूनही वनडेत 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने भारताकडून वनडेत 160 व्या डावात सलामीला फलंदाजी करताना हा टप्पा पार केला. त्यामुळे तो सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करणारा सलामीवीर ठरला आहे.

त्याने हाशिम आमलाच्या विक्रमाला मागे टाकले आहे. आमलाने सलामीवीर म्हणून खेळताना 173 डावात 8000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.

  • सर्वात जलद 8000 धावा करणारे सलामीवीर

  • 160 डाव - रोहित शर्मा

  • 173 डाव - हाशिम आमला

  • 179 डाव - सचिन तेंडुलकर

  • 208 डाव - सौरव गांगुली

  • 209 डाव - ख्रिस गेल

Rohit Sharma
Virat Kohli: किंग कोहलीने ठोकलं 77 वे शतक! सचिन तेंडुलकरलाही पछाडत रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
  • सिक्सर किंग

इतकेच नाही, तर आता रोहित आशिया चषक वनडे स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाराही खेळाडू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत २८ षटकार मारले आहे. त्याने हा विक्रम करताना शाहिद आफ्रिदीच्या २६ षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले.

  • पहिलाच भारतीय

दरम्यान, रोहितने आशिया चषकात (वनडे प्रकारात) 50 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही 10 वी वेळ होती. त्यामुळे तो हा पराक्रम करणारा पहिलाचा भारतीय, तर एकूण दुसराच फलंदाज ठरला आहे.

त्याच्यापूर्वी कुमार संगकाराने 12 वेळा 50 धावांचा टप्पा आशिया चषक स्पर्धेत खेळताना ओलांडला आहे. या दोघांच्या पाठोपाठ सनथ जयसूर्या आणि सचिन तेंडुलकर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 9 वेळा 50 धावांचा टप्पा आशिया चषकात खेळताना ओलांडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com